मुंबई : बदल हा आपल्या जीवनातील एक सातत्यपूर्ण घटक आहे. मग तो अमुक एका कालावधीमध्ये झालेला असो किंवा अगदी एकाएकी झालेला असो. हाच बदल आपल्याला अशा एका विश्वात नेतो जे वेगळं आहे, अनपेक्षित आहे आणि तितकंच नवंही आहे. ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. यामुळं 'एबीपी' या ब्रँडची आणि त्याच्याशी संलग्न वाहिन्यांची ओळखच बदलली आहे. आज सकाळी सात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबीपी न्यूज नेटवर्कच्या नव्या लोगोचं, नव्या रुपाचं अनावरण करण्यात
आलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच एबीपी माझाच्या बदलाचे अनेक मान्यवरही साक्षीदार आहेत. एबीपी माझाला अनेक मान्यवरांनी या नव्या बदलांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला नव्या बदलांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून एबीपी माझाला शुभेच्छा!
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एबीपी माझाला शुभेच्छा देताना म्हणाले की, "महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी एबीपी माझाला 13 वर्ष पूर्ण होत असून ही वृत्तवाहिनी आता नव्या लोगोसह लोकांसमोर येत आहे, हे पाहून आनंद वाटला. कोरोना काळात सर्व लोक घरी असताना चॅनलमधील लोकांनी युद्धपातळीवर आपलं काम केलं. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. मी एबीपी माझाचे अभिनंदन करतो आणि चॅनलच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो."
सामान्य माणसांची दुःख सरकारपर्यंत पोहोचली पाहिजेत, याकरता एबीपी माझानं सातत्यानं भूमिका घेतली : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एबीपी माझाला शुभेच्छा देताना म्हणाले की, "एबीपी माझा नव्या लोगोसहित, नव्या ढंगात आणि पूर्णपणे नव्या रुपात पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे. खरं तर गेल्या 13 वर्षांत एबीपी माझानं एक आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सातत्यानं समाजाचे विविध प्रश्न मांडत असताना, समाजातील सामान्य माणसांची दुःख सरकारपर्यंत पोहोचली पाहिजेत, याकरता एबीपी माझानं सातत्यानं भूमिका घेतली आहे. आता पुन्हा एकदा या नव्या रुपात एबीपी माझा सामान्य माणसाचंच चॅनल असेल, अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सरकारनं केलेली चांगली काम नक्कीच दाखवली पाहिजेत, त्याचसोबत समाजाच्या व्यथा आहेत, त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे देखील माध्यमांनी केलं पाहिजे. मला विश्वास आहे एबीपी माझा उत्तम पद्धतीनं करेल. कोणत्याही प्रकारे सत्तेसमोर एबीपी माझा नतमस्तक होणार नाही."
एबीपी माझाने केवळ माहिती पोहोचवली नाही, तर ज्ञानात भर पाडण्याचंही काम केलं : नितीन गडकरी
भाजप नेते नितीन गडकरी एबीपी माझाला शुभेच्छा देताना म्हणाले की, "राजकीय, सामाजिक दृष्ट्या सर्व विषयांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं लोकशाहीत आवश्यक आहे. हे पोहोचवण्याचं काम नेहमी होतंच. पण नाविन्य, नवीन रिसर्च किंवा आता कोरोना लसीबाबत जगभरातील अपडेट हे आम्हाला माध्यमांमधूनच मिळाले. ही माहिती एबीपी माझाने वेळोवेळी आमच्यापर्यंत पोहोचवली." पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, "एबीपी माझाने केवळ माहिती पोहोचवली नाही, तर ज्ञानात भर पाडण्याचंही काम केलं आहे. त्यामुळे काळानुसार बदल हा आवश्यक आहे. तो बदल एबीपी करतेय, याचा मला अतिशय आनंद आहे. माझ्याकडून एबीपी माझाला खूप शुभेच्छा!"
महत्त्वाच्या बातम्या :