RSS centenary celebrations: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यंदा शताब्दी वर्षानिमित्त अमरावती शाखेच्या दसरा महोत्सव कार्यक्रम 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अमरावतीचा विजय दशमी सोहळा 5 ऑक्टोबरला श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा आणि देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई या उपस्थित राहणार आहेत. संघाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून कमलताईंनी निमंत्रण स्वीकारलं असल्याची माहिती आहे. मात्र, कमलताई गवई यांच्या नावाने एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतं असून त्यामध्ये संघाच्या कार्यक्रमात जाणार नाही आणि बरंच काही लिहलं आहे.
भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिलं
या संदर्भात एबीपी माझाकडून कमलताई गवई यांच्या घरी चार तास त्यांची वाट पाहिली पण त्या बाहेरगावी गेल्याने येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्या संघाच्या कार्यक्रमात जाणार किंवा नाही हे स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री गवई यांच्या अमरावतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, सध्या सरन्यायाधीश यांच्या मातोश्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभराव्या स्थापना सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही यावर वाद निर्माण केल्या जात आहे. एक स्मरण करून द्यायचे आहे की, सरन्यायधीशांचे दिवंगत वडील व माजी राज्यपाल श्री रा. सु. गवई स्वतः संघाच्या नागपुरातील विजयादशमी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वयंसेवक म्हणून मी त्याचा साक्षीदार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजयादशमीला झाली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीला झाली. या संघटनेची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे केली. या वर्षी आपली शताब्दी साजरी करत आहे. देशभरात एक लाखांहून अधिक हिंदू परिषदा आणि हजारो चर्चासत्रे आयोजित केली जातील. शताब्दी वर्षाची सुरुवात मोहन भागवत यांच्या 2 ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱ्या वार्षिक विजयादशमीच्या भाषणाने होईल. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, आरएसएसने देशभरात घरोघरी जाऊन प्रचार करण्याची योजना देखील आखली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या