Complaint from Shiv Sena Thackeray group to Governor: राज्यातील महायुती सरकारच्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात आणि मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यपालांची भेट घेत तक्रार करण्यात आली. यामध्ये मंत्रालयामध्ये रमीचा डाव मांडणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गृहराज्यमंत्री असूनही सावली बार चालवणारे योगेश कदम यांच्यासह छावा संघटनेच्या अध्यक्षाला झालेली मारहाण या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार उपस्थित होते. सुषमा अंधारे सुद्धा राज्यपालांच्या भेटीच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी होत्या. यावेळी राज्यपालांचा निवेदन दिल्यानंतर अंबादास दानवे यांनी चांगलाच हल्लाबोल केला. 

Continues below advertisement


राज्याचा गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतो, मुख्यमंत्री गृहमंत्री झोपलेत का?


ते म्हणाले की योगेश कदम यांच्या आईचे नाव आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये 22 बार गर्ल पकडल्या गेल्या. राज्याचा गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतो. मुख्यमंत्री गृहमंत्री झोपलेत का? अशी विचारणा अंबादास दानवे यांनी केली. ते म्हणाले की आम्ही महायुतीच्या मंत्र्यांची तक्रार केली आहे. लोकशाहीच्या मंदिरामध्ये यांचे मंत्री रमी खेळतात असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की आमदार वेटरला मारतात त्याचबरोबर गैरवर्धन करतात. छावा संघटनेच्या अध्यक्षांना मारहाण होते. हे सर्व सत्ताधारी करत असताना सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी केला. 


तर सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ


एकनाथ शिंदे जर अशांना पाठीशी घालत असतील तर त्यांना पदावरून काढा अशी मागणी सुद्धा दानवे यांनी केल. ते म्हणाले की पुढे मुख्यमंत्री, गृहमंत्री झोपले आहेत का? या संदर्भात राज्यपालांकडे दाद मागितली असून जनतेकडेही दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. वेळ पडली तर सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ असा इशारा सुद्धा दानवे यांनी दिला.  दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आम्ही प्लान वैगेरे केलेला नाही.  जनतेच्या कोर्टात जायचं, लढायचं. एकास एक आला तर फायदा होईलच ना? असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले की अजित पवार त्यांच्या लोकांना पाठिंबा देत आहेत. माणिकराव कोकाटेंना सुद्धा अजित पवार संरक्षण देत आहेत. मात्र त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विधानभवनात पत्त्याचा कॅटच घेऊन जावं लागेल असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.