Chandrakant Patil : राज्याच्या राजकारणातून पहिल्यांदा कोणी बाहेर पडायचे आणि भाजपबरोबर सरकार स्थापन करायचे यासाठी पक्षांची चढाओढ लागली असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 मध्ये राज्यातील सरकार स्थापनेबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सांगायला पवारांना इतका वेळ का लागला? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघेही इतके मोठे नेते आहेत, त्यांच्यात झालेली चर्चा ही आपल्या सांगण्याइतका मोठा नेता मी नसल्याचे पाटील म्हणाले.


पहिल्यांदा कोण बाहेर पडणार आणि भाजपबरोबर सत्ता स्थापन करणार यासाठी राज्य सरकारमध्ये चढाओढ चालली आहे. तुम्ही कोणासोबत जाणार असा प्रश्न पाटील यांना विचारला असता ते म्हणाले की, मला माहित नाही. कारण आमच्या पक्षात मी एकट्याने सांगण्याइतकी हुकूमशाही नाही, आमच्या पक्षात लोकशाही असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. गेल्या 26 महिन्यात शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा इतिहास आहे. भाजपच्या आमदारांना निधी द्यायचा नाही. सामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे हा महाविकास आघाडीचा इतिहास आहे. त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले.


महाविकास आघाडी सरकारचे नेमकं चाललंय काय? आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई इतकंच काम राज्यात उरलंय? केंद्रीय मंत्री असले तरी कायद्यानुसार राणेसाहेबांना नोटिस देता येत असली, तरी 65 वर्षांवरील व्यक्तीसाठी वेगळी तरतूद आहे, याचा सोयिस्कर विसर? पडला असल्याचे पाटील म्हणाले.
मुळात राज्य सरकारला कायद्याची इतकी बूज असती तर विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी कायदा धाब्यावर कशाला बसवला असता? सोयीचं तेच आपलं, अशा धोरणानं कारभार चाललाय. अशा नोटिशी देऊन राणेसाहेबांना महाराष्ट्रात येणं भाग पाडलं की, तुम्ही जिंकलात? किती बालिश, किती हास्यास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.


अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेला कसं बनवलं, हे स्वतःच सांगितलंय. 'माझ्या एका वाक्याने भाजपा-शिवसेनेत दुरावा निर्माण झाला,' असं ते म्हणालेत. खरं तर त्यांनी मी शिवसेनेला भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसायला कसं भाग पाडलं, असं म्हणणं अधिक संयुक्तिक झालं असतं. तरीही जर शिवसेनेला त्यांच्यासोबत प्रेम असल्याचे पाटील म्हणाले.