दानवेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं मौन!
एबीपी माझा वेब टीम | 13 May 2017 02:10 PM (IST)
उस्मानाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगलं आहे. दानवेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. शेतकऱ्याला मानवाकडून अपेक्षा, दानवाकडून नाही : राज ठाकरे मुख्यमंत्री आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना पत्रकारांनी दानवेंच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्री पुढे निघून गेले. दानवे काय म्हणाले? राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता. …तर शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो : रावसाहेब दानवे मी कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरला, शेतकऱ्यांबद्दल नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शेतकऱ्यांची मनं दुखावली असतील तर दिलगिरी करतो असं म्हणत त्यांनी सशर्त माफी मागितली. त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल दानवे माफी मागत आहेत, की उपकार करत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे. संबंधित बातम्या :