मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांचा नियोजित दौरा असा
मुख्यमंत्री सकाळी 10 वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन करतील तिथून रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पाकडे प्रयाण करतील . तिथे पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा 4 विद्युतगृहाची पाहणी करणार आहेत. नंतर कोयना धरण परिसराची पाहणी करुन ते ओझर्डे (ता. मावळ, जि. पुणे) कडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन होऊन ते गाडीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. 2 च्या प्रकल्पस्थळाकडे प्रयाण करणार आहेत. 2.20 वाजता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी करतील नंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली-कुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाचे सादरीकरण त्यांच्यासमोर होणार आहे.
कुसगाव ते सिंहगड कॉलेज, लोणावळा मिसिंक लिंक प्रोजेक्ट
- एकूण 18 किलोमीटरचा हा मिसिंक लिंक प्रोजेक्ट आहे
- कुसगाव अर्थात खालापूर टोल नाका ते खोपोली एक्झिट पर्यंतचा 5.86 किमीचा मार्ग आठ पदरी होईल
- तिथून 'व्हाया डक्ट' हा 900 मीटरचा पहिला पूल असेल
- पहिला पूल संपतो तिथून 1.6 किमीचा पहिला बोगदा सुरू होईल
- पहिला बोगदा जिथे संपतो तिथून 'केबल स्टेड' नावाचा 650 मीटर लांबी आणि 135 मीटर उंचीचा दुसरा पूल, जो देशात पहिलाच पूल असेल.
- दुसरा पूल जिथं संपतो त्या नागफणी सुळक्या खालून 8.9 किमीचा दुसरा महाकाय बोगदा सुरू होईल. जो लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज समोर संपेल.
- महाकाय दोन बोगदे आणि दोन पुलांचं आत्तापर्यंत 20 टक्के काम पूर्ण झालंय.
- यासाठी 700 कोटींचा खर्च झालाय.
- यापैकी दोन नंबरचा बोगदा म्हणजे लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज समोरील कामाची मुख्यमंत्री पाहणी करतील.
- 8.9 किमी अंतराच्या या बोगद्यातील एका मार्गिकेचं 2 किमी तर दुसऱ्या मार्गिकेचं 500 मीटरचे काम पूर्ण झालेलं आहे.