मुंबई : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी केली आहे. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकेल. तसेच मराठा समाजाचा न्याय हक्क मिळवून देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.


उद्धव ठाकरे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचा आरोग्य आराखाडा तयार झालेला आहे. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्या राज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स निर्माण केले आहे.


राज्याच्या हिताच्या आड आपलं राजकारण येता कामा नये : मुख्यमंत्री


कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेची मालकी राज्याची आहे. जागाही राज्याची आणि प्रकल्प देखील राज्याचा आहे. बुलेट ट्रेन कोणाच्या फायद्यासाठी आहे? राज्याच्या हिताच्या आड राजकारण नको. विरोधाला विरोध करता कामा नये. राज्याला मातीत घालणारे राजकारण बंद केले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


देवेंद्रजींनी दिल्लीत जावं ही मुनगंटीवारांची इच्छा : मुख्यमंत्री


देवेंद्रजींनी दिल्लीत जावं ही मुनगंटीवारांची इच्छा, असा टोला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यावर नाना पटोले यांनी आमच्या मित्राच्या मागे का लागता असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही इथेच थांबा तुम्ही कुठे जाऊ नका. त्यानंतर सभागृहात  हशा पिकला.


आम्ही हिंदुत्व सोडले नाही : मुख्यमंत्री


महाराष्ट्रातील गडकिल्ले ही आपली ओळख आहे, हा प्रदेश देवदेवतांचा साधुसंतांचा आहे. प्राचीन मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी  तसेच सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यासाठी निधी राखून ठेवला जाईल आपण सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या वरून आम्ही हिंदुत्व सोडले नाही, हे देखील लक्षात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


प्रताप सरहनाईक यांच्या मागे ईडी लावली, त्यांच्या मुलांच्या मागे लावली, नातू असता तर त्याच्या मागेही लावली असती. ही विकृती आहे, या राजकारणाला आम्ही महाराष्ट्रात थारा देणार नाही. ईडी, सीबीआयचा घरातील नोकरासारखा वापर करून राजकारण आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.