बुलडाणा/ औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बुलडाणा आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते थोड्याच वेळात लोणार सरोवर येथे पोहोचत आहेत. मुख्यमंत्री लोणार सरोवराची पाहणी करणार असून त्या वनकुटी येथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सरोवरातील गायमुख या ठिकाणी पाहणी करीत सरोवराचे अवलोकन करण्यार आहे. मुख्यमंत्री 2 तास लोणार सरोवर येथे थांबणार आहेत. त्यानंतर ते दुपारुन औरंगाबाद येथे राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री ठाकरे दुपारी साधारण बारा वाजता औरंगाबादमध्ये पोहोचतील. चिखलठाणा येथे त्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल भूमिपुजन होणाक आहे. त्यानंतर ते दुपारी 12.30 वाजता औरंगाबाद शहर पाणीपुरवठा दिल्लीगेट जलकुंभ पाण्याच्या कामाची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर मुख्यमंत्री ठाकरे दुपारी 12.45 वाजता जिल्हा नियोजन सभागृह येथे एक बैठक घेणार आहेत.
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याचा इशारा देणाऱ्या मनसेच्या नेत्यांना स्थानबद्ध कऱण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ताब्यात घेतले आहे. या नेत्यांना क्रांती चौक पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे, संदीप कुलकर्णी यांच्यासब कार्यकर्ते स्थानबद्ध केले आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा संपेपर्यंत या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध ठेवणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दराडे यांनी दिलीय.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा
सकाळी ८.५५ औरंगाबाद विमानतळ येथे आगामन
सकाळी ९ वा बुलढाणा लोणारकडे प्रयाण
सकाळी ९.३० लोणार हेलिपॅडवर आगमन
सकाळी ९.३५ वनविभागाजवळ सरोवर व्ह्यू पाॅईटकडे प्रयाण
सकाळी ९.५५ धारातीर्थकडे प्रयाण
सकाळी १० धारातीर्थी लोणारची पाहणी
सकाळी १०.१५ लोणार सरोवर संवर्धन व विकास कामांची बैठक
सकाळी ११.१५ औरंगाबादकडे प्रयाण
सकाळी ११.५० मोटारीनं चिखलठाणा क्रीडा संकुल बैठक
दुपारी १२.०० जिल्हाक्रीडा संकुल चिखलठाणा भूमिपुजन
दुपारी १२.३० औरंगाबाद शहर पाणीपुरवठा दिल्लीगेट जलकुंभ पाण्याच्या कामाची पाहणी
दुपारी १२.४५ जिल्हानियोजन सभागृह येथे आगमन बैठक
दुपारी २ वाजता :- मुंबईकडे रवाना
दुपारी ३ वाजता :: मातोश्रीवर आगमन