मुंबई :  सूडबुद्धीनं आमचं सरकार कारवाई करणार नाही, कर नाही त्याला डर कशाला? दूध का दूध पानी का पानी होईल, घाबरायची काय गरज अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar ED Raid)  यांच्यावरील ईडी (ED)  धाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी दिली आहे. तसेच राजकीय आकस ठेऊन आम्ही काम करणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 

Continues below advertisement

एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या हातात ईडी नाही.  चूक नसेल तर घाबरण्याचे काय कारण आहे. कर नाही त्याला डर कशाला? राजकीय आकस ठेऊन आम्ही काम करणार नाही. कोरोनामध्ये किती भ्रष्टाचार झालाय तुम्हाला माहिती आहे. आम्ही मग त्यांना काय म्हणायचं खिचडीचोर म्हणायचं का? कोणाला घाबरण्याचे काय कारण आहे. आम्ही राज्याला पुढे नेण्याचे काम करतो आहे. नव्या प्रकल्पाचे उद्घाटन होतोय  हे विरोध करत होते त्या प्रकल्पांना आम्ही पुढे नेत आहे.  

मेरीटप्रमाणे निकाल अपेक्षित: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमदार अपात्रता प्रकरण निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही.  विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली असून उद्या निकाल येईल. बहुमताला लोकशाहीत महत्त्व आहे . विधानसभा आणि लोकसभेत बहुमत आहे. आमच्याकडे अधिकृत चिन्ह आहे. मेरीटप्रमाणे निकाल अपेक्षित आहे. नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही.  घटनाबाह्य काम आम्ही केलेलं नाही.

Continues below advertisement

ईडी स्वायत्त संस्था, त्यांच्यावर दबाव नाही: शंभूराज देसाई

ईडी ही स्वायत्त संस्था आहे. त्यांना जेव्हा काही आढळतं, तेव्हा ते त्यांच्या आधिकारानुसार कारवाई करतात त्यांच्यावर दबाव वगैरे नाही. गेली 4-5 वर्षं हा जोगेश्वरी भूखंड घोटाळा गाजतो आहे. जर ईडी ला वाटत असेल तर ते कारवाई करतील. ईडीकडे याबाबत माहिती समोर  सेल तर त्यांनी चौकशी केली पाहिजे. त्यांचा अधिकार  आहे. नाहक कारण नसताना कोणीही चौकशी करत नाही, असे शंभुराज देसाई म्हणाले. 

चौकशीत अनेकांची नावं समोर येतील:  संजय शिरसाट

वायकर यांना यापूर्वी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.  मात्र ते सहकार्य करत नसल्यामुळे ही छापेमारी झाली असावी, या चौकशीत अनेकांची नावं समोर येतील, असे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले. 

हे ही वाचा :