Eknath Shinde on Shiv sena dhanush ban : धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल असा विश्वाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार आणि आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये निवडणूक चिन्हाबाबत चर्चा झाली. तसेच उद्धव ठाकरे गटानं स्टॅम्प पेपर घोटाळा केल्याची चर्चा या बैठकीत झाल्याचं समोर आलं आहे.  


शिंदे गटाच्या बैठकीत काय काय घडलं ? 
सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षा निवासस्थानावर झालेल्या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली. यामध्ये तेलगीपेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रात घडला आहे. प्रतिज्ञा सादर करणायासाठी स्टॅम्पपेपरचा वापर करण्यात आला आहे. 
हा घोटाळा तेलगीपेक्षा मोठा घोटाळा आहे.  या घोटाळ्यात ठाकरे गटाचे मोठे नेते अडकणार आहेत. मुंबई शपथपत्र घोटाळा...स्टॅम्प पेपरचा वापर करून शपथपत्रे बनवली आहेत. नोटरी करणाऱ्यांनीच शपथपत्रे बनवली, 4682 शपथपत्रे पोलिसांनी केली जप्त केली आहेत. 


धनुष्यबाण चिन्ह हे आपल्यालाच मिळणार!! शिंदेंनी व्यक्त केला आमदार आणि खासदारांपुढे विश्वास 


आपल्याकडे लोकप्रनितिधींची संख्या जास्त आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही. धनुष्यबाण चिन्ह मिळणार नाही याची कल्पना ठाकरे गटाला होती त्यामुळेच त्यांनी सर्व चिन्ह तयारी ठेवली होती. 
कारण त्यांना माहित आहे आपल्याकडे संख्याबळ कमी आहे. देशात जे घडलं तेच आपल्यासोबत घडेल, लोकप्रतिनिधींचं संख्याबळ ज्यांच्याकडे असतं त्यांना न्याय दिला जातो. आपल्यालाही न्याय मिळेल असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  


100 दिवसांत सरकारनं केलेली काम घरांघरात पोहचली पाहिजेत. माझ्यासोबत आलेल्या आमदारांना जिंकवण्याची जबाबदारी माझी आहे. पण आमदारांनी मतदारसंघातली विकास कामं केली पाहिजेत. आपल्या मतदारस्ंघातल्या काही कामांना स्थगिती दिली आहे ती उठवली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


 शिंदे गटाचा या चिन्हांवर दावा - 
हिंदुत्ववादी विचारांना पुढे घेऊन जात असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाने काही आक्रमक चिन्ह घेता येईल का याची आजच्या बैठकीत चाचपणी केल्याची माहिती आहे. त्यामध्ये तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना शिंदे गटाकडून प्राधान्य दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत शिंदे गट या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार असल्याची माहिती आहे. तसेच पक्षाचं नाव घेताना शिंदे गटानेही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश केल्याची माहिती आहे. त्याशिवाय आनंद दिघे यांच्या नावाचाही समावेश करण्यात आल्याचं समोर आले आहे.