पुणे : मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घाई गडबडीत घेता येणार नाही. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. शासन कोणालाही फसवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पुणे जिल्हातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे ते बोलत होते.