मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षखेखाली पार पडली. आजच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडेंची अनुपस्थिति लक्षवेधी ठरली, कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. मात्र, डोळ्याचे ऑपरेशन झाल्यामुळेच आपण या बैठकीला उपस्थित नव्हतो, असे स्पष्टीकरण मंत्री मुंडेंच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आले आहे. तर, मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत पालक सचिवांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरुन (Minister) राजकीय वाद उफाळला होता, तो अद्यापही शांत झाला नाही. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन हा वाद आजही कायम आहे. त्यातच, पालक सचिवांच्या कामगिरीवर मुख्यमंत्र्‍यांनी मंत्रिमंडळात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

Continues below advertisement

राज्यात पालकमंत्रीपदावरुन वाद सुरू असला तरी प्रत्येक जिल्ह्यात पालक सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. या पालक सचिवांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कामकाजाचा आढावा घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही काही पालक सचिव हे त्यांना नेमून देण्यात आलेल्या जिल्ह्यातदेखील गेले नाहीत. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मंत्रीमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्यासोबत पालक सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, 11 पालक सचिव अद्यापही आपापल्या जिल्ह्यात गेले नसल्याने मुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री या विषयावरुन संतप्त झाले होते. तसेच, तत्काळ सर्व पालक सचिवांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन बैठका घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्‍यांनी दिले आहेत. त्यामुळे, पुढील काही दिवसांत आता प्रत्येक जिल्ह्यात पालक सचिव जाऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतील. 

मंत्रिंमडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Continues below advertisement

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

✅ देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी 2599.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली. प्रकल्पातून 69.42 दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला जाईल.

✅ जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.- जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात 8350 हेक्टरला सिंचन- शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात 5730 हेक्टरला सिंचन

✅ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती करणार

हेही वाचा

धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?