CM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींवर काही निर्णय होतो का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असताना मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं सांगितलंय . महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली . निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांऐवजी 2100 महिलांना देऊ असा आश्वासन महायुतीने प्रचारादरम्यान दिलं होतं . लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी .2100 रुपये देणार असल्याचं पत्रकार परिषदेत ते म्हणाले आहेत . 'बजेटच्या वेळेस यासंदर्भात विचार करू . आमचे आर्थिक स्त्रोत यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार' असल्याचं फडणवीस म्हणाले .
लाडकी बहीण योजना सुरुच राहणार- देवेंद्र फडणवीस
'जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण करू . ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती आधी करू . निकषाच्या बाहेर कोणी भेटला , तक्रारी आल्या तर त्याचा पुनर्विचार ही करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले . शेतकरी सन्मान योजनेतही सुरुवातीला जे लाभार्थी होते . तेव्हाही लक्षात आलं होतं की मोठ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय . नंतर अनेक शेतकऱ्यांनीच सांगितलं आम्ही निकषात बसत नाही . त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल', पण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचं कारण नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले .
निकषाबाहेर असणाऱ्या अर्जांचा पुर्नविचार करणार
लाडकी बहीण योजनेचे पैसे गरजवंतांना मिळावे यासाठी या योजनेत पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार असून गरजू महिलांनाच अर्थसहाय्य मिळावे यासाठी पडताळणी केली जाणार असल्याचं नुकतच सांगण्यात आलं होतं . राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता. निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला होता त्या त्या सर्व महिलांना दर महिन्याला रु1500 पयांचा हप्ता दिला गेला. त्याचबरोबर निवडणुकीनंतर सत्ता आल्यास 2100 रुपयांचा हप्ता देऊ, असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. हे पैसे गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात असल्याची वृत्त येत होती. आता मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण सुरुच ठेवणार असल्याचं सांगत 2100 रुपये देणार असल्याचंही सांगितलंय. योजनेत ज्या महिला निकषाबाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार करणार असल्याचं सांगितलंय.