CM Devendra Fadnavis : जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे. याचा मला आनंद आहे, त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव देखील झाली. जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी हे यश दिलं असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. महाराष्ट्र (Maharashtra) आता थांबणार नाही याचा अर्थ अडीच वर्षापूर्वी आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही राज्याला ट्रॅकवर आणलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते, तर मी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले होते. आता पुढच्या काळात प्रकल्पांना वेगाने पुढे नेणार आहोत. येत्या काळात माझा भर हा नदीजोड प्रकल्पावर असणार आहे. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रीन एनर्जीवर भर असणार आहे, असं फडणवीस म्हणाले.
रोजगाराची निर्मिती होणार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीडी सह्याद्रीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. पुढच्या काळात नदीजोड चार नदीजोड प्रकल्पावार माझा भर असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी आता चार प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करु शकतात असे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रीन एनर्जीवर देखील माझा भर राहणार आहे. 2030 मध्ये 52 टक्के वीज ग्रीन एनर्जी असेल असंही फडणवीस म्हणाले. याचा शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. यामुळं रोजगाराची निर्मिती होईल, अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल असेल असे फडणवीस म्हणाले. येणाऱ्या काळात अनेक गोष्टी करायच्या आहेत. सगळ्या योजना चालवायच्या आहेत.
धारावीच्या प्रकल्पाबाबात नेमकं काय म्हणाले फडणवीस?
धारावीची संकल्पना राजीव गांधीच्या काळात मांडली होती. यावर कोणत्याचं सरकारन काहीच केलं नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाचा जीपीआर तयार केला. हा प्रकल्प करायचा असेल तर जास्त जागा लागणार म्हणून आम्ही रेल्वेकडून जागा विकत घेतल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचं टेंडर काढलं. विकासक देखीस नेमला होता. त्यावेळी विकासक हे काय गौतम अदानी नव्हते. मात्र, तरीदेखील महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर त्यांनी टेंडर रद्द केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. आताचे जे नवीन टेंडर तयार केलं आहे ते उद्धव ठाकरे यांचे सरकारपनं तयार केले आहेत. यातील एकच गोष्टी मी बदलली आहे. ती म्हणजे टीडीआरचे कॅपिंग करा हे सांगितलं. मार्केट रेटच्या 90 टक्के किंमत करता येईल, त्यापेक्षा जास्त किंमत करता येणार नाही. त्याचा डिजीटल प्लॅटफॉर्म असेल हे देखील सांगतल्याचे फडणवीस म्हणाले. नियमात बसणाऱ्यांना धारावीतच घर देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. जे नियमात बसत नाहीत नाहीत, त्यांच्यासाठी रेंटल हाऊसिंग करायचे ठरले आहे. 10 ते 12 वर्षानंतर थोडे पैसे भरले की ते घर त्यांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. गरीबासाठी घर देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: