Devendra Fadnavis on Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गासाठी वित्त विभागाकडून कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही. जेव्हा एखादा महामार्ग बांधला जातो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेसाठी दालने उघड असतो आणि त्यामधून विकासाचा मार्ग प्रशस्त होत असतो, जगभरापासून देशांकडून पायाभूत सुविधांची कामही कर्ज घेऊनच तयार केली जातात, जेव्हा पायाभूत सुविधांसाठी कर्ज घेतले जातात तेव्हा ती उत्तम लक्ष मानलं जातं आणि ते अर्थव्यवस्थेला बळकट देणार असतं, समृद्धी महामार्गाने सुद्धा असेच चित्र बदललं, त्यामुळे  मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ हे उत्तर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 


दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ उत्तर 


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ हे उत्तर असणार आहे. तो एक ॲक्सेस कंट्रोल रोड नसेल, तर त्या महामार्गावर प्रत्यक्ष रेंजमध्ये आम्ही 100 शेततळी बांधणार आहोत. तसेच ब्रिज कम बंधारे बांधून पाणी अडवण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत आणि ते जलसंवर्धनासाठी उपयुक्त होईल., त्या माध्यमातून ग्रीन एनर्जी तयार करणार आहोत. त्यामुळे मराठवाडा आणि दुष्काळी भागात चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग असेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, शक्तिपीठ महामार्गाला कॅबिनेट मंजुरी देण्यात आल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन सुरु झाली आहेत. महाविकास आघाडीकडून यासाठी आता व्यापक आंदोलन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सुद्धा आज धाराशिवमध्ये जात थेट बांधावर जाऊन शेतीच्या मोजणीला विरोध केला आहे. 


आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक


दुसरीकडे, या शक्तीपीठ महामार्गावरून आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा हल्लाबोल केला आहे. सतेज पाटील म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. आता, मात्र ही घोषणा मतांसाठी होती का? असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे ते म्हणाले. गरज नसलेला हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका, असे पाटील यांनी सांगितले. आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक ऑनलाईन घेणार आहोत. यामध्ये पुढील रणनीती ठरवून महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे सरकार कॉन्ट्रॅक्टर धार्जिण असल्याचा हल्लाबोल सुद्धा पाटलांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या