सोलापूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. येत्या 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा अनावरण सोहळ्याला या दोन्ही नेत्यांची उपस्थिती होणार होता. मात्र,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. त्यामुळं आता मंगळवेढा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यावर शिक्का मोर्तब झालं आहे.

Continues below advertisement

दोन दिवसात मनोज जरांगे पाटलांची बोलून तारीख फिक्स करणार

दोन दिवसात मनोज जरांगे पाटलांची बोलून तारीख फिक्स करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. आज झालेल्या बैठकीत मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा सर्वानुमते घेतला निर्णय घेतला आहे. 

 या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार तसेच सर्व पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार 

या भव्य सोहळ्याचे आयोजन भाजपचे पंढरपूर-मंगळवेढा आमदार समाधान अवताडे यांनी केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती.  या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार तसेच सर्व पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही अवताडे यांनी सांगितले होते. मात्र, अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाला आहे. 

Continues below advertisement

मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील एका स्टेजवर दिसणार असल्यामुळे या कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व प्रचंड वाढले होते

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील एका स्टेजवर दिसणार असल्यामुळे या कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व प्रचंड वाढले होते. पुतळा समितीचे सदस्य कौंडू भैरी यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे जरांगे दादांनीही या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे,” असे त्यांनी म्हटले होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा रद्द झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil मोठी बातमी: देवेंद्र फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार; नेमकं कारण काय?