औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची तब्येत बरी नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते साताऱ्यातील आपल्या मूळ गावी गेले असून, त्यांना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याचे कळत आहे. दरम्यान, याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे आजारी असून, त्यांना 15 ऑगस्ट नंतर आम्ही बळजबरीने रुग्णालयात पाठवणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.


पुण्यातील चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचं आज लोकार्पण (Chandani Chawk Flyover) करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. मात्र, 15 ऑगस्टनंतर मुख्यमंत्री शिंदे यांना बळजबरीने रुग्णालयात पाठवणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. 


काय म्हणाले शिरसाट? 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास काम करतात, हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यांची तब्येत ठीक नाही.  त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते पुण्याच्या कार्यक्रमात गेले नाही. त्यांची काळजी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे काहीही असलं तरीही तुम्ही दोन किंवा तीन दिवस हॉस्पिटल मध्ये जा अशी त्यांना विनंती करणार असल्याचे शिरसाट म्हणाले. 


वेगवेगळ्या मतप्रवाहाचा अनेकांनी सपाट लावला आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन दिवसापासून अनेक लोकांनी वेगवेगळ्या मत प्रवाह व्यक्त करण्याचा सपाट लावला आहे. उदाहरणार्थ अजित दादांनी घेतलेली वॉररूम मधली बैठक असेल, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील झेंडावंदना दिलेले पालकमंत्री असतील. खरं तर या गोष्टीच्या सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे. एक अशी सत्ता आलेली आहे तिच्यासाठी सर्वांना काम करण्याची संधी मिळत आहे. सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेऊन काम करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिला आहे, असेही शिरसाट म्हणाले. तर याचवेळी विरोधकांवर टीकाकरतांना शिरसाट म्हणाले की,"विरोधी पक्षातील आमदार आणि विरोधी पक्षनेते यांनी जनतेसाठी काय करायले पाहिजे यावर बोलले पाहिजे. मात्र, ते वैयक्तिक राजकारणावर बोलत असल्याचे शिरसाट म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sanjay Shirsat : सामनामध्ये आता किडे, झुरळ पहायला मिळतात; शिरसाट यांची खोचक टीका