मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा हे धंगेकरांवर प्रेशर आणतायेत, रोहित पवारांचा हल्लाबोल

Advertisement
मिकी घई, एबीपी माझा   |  12 Oct 2025 05:07 PM (IST)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांना तू शांत बस नाहीतर मी तुझ्या बॉसशी बोलतो असं म्हणत असल्याची टीका आमदार गोरित पवार यांनी केली.

Rohit Pawar

Rohit Pawar : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांना तू शांत बस नाहीतर मी तुझ्या बॉसशी बोलतो असं म्हणत आहेत. तर धंगेकर विसरले आहेत की ते काँग्रेसमध्ये नाहीत असे चंद्रकातं पाटील (Chandrakant Patil)  म्हणत आहेत. हे दोन्ही नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर प्रेशर आणायचा प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पावर (Rohit Pawar) यांनी केलं आहे. जो माणूस लोकांच्या वतीने गुंडागिरी विरोधात बोलत आहेत, त्याचा आवाज सत्तेचा वापर करुन बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे रोहित पवार म्हणाले.  

Continues below advertisement

पुणे हे गुंडा गर्दीचे माहेरघर आहे का? रोहित पवारांचा प्रश्न

आज तुमच्याकडे पॉवर आहे त्या पॉवरचा सत्तेचा वापर करत त्या नेत्याल हाताशी घ्या आणि पुण्यातली गुंडागिरी कसं कमी करता येईल यावर चर्चा करा यासाठी प्रयत्न करा असे रोहित पवार म्हणाले. पुणे हे गुंडा गर्दीचे माहेरघर आहे का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज बंद करण्याकरता गुन्हेगारी या शहरातून कशी संपेल यासाठी प्रयत्न करावेत असे रोहित पवार म्हणाले. हे सरकार कॉन्ट्रॅक्टर आणि गुन्हेगार या लोकांना पाठबळ देताना दिसत असल्याचे पवार म्हणाले. 

अनेकांनी माझी तक्रार केली पण मला एकनाथ शिंदेंचा फोन आलेला नाही - धंगेकर

पुण्यातील कोथरुड परिसरातील गोळीबारानंतर गुंड निलेश घायवळ (nilesh Ghaywal) आणि त्याचे कारनामे चर्चेत आले, त्याच्या पाठीशी राजकीय पाठबळ असल्याचा दावा काहींनी केला. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी याप्रकरणात भाजपविरोधात मोर्चा उघडला आहे. निलेश घायवळ (nilesh Ghaywal) ज्या पद्धतीने दादागिरी करतोय खोटा पासपोर्ट केला लोकांचे मुडदे पाडले किंवा समीर पाटील असेल ही सर्व लोक चंद्रकांत पाटील यांच्या आसपास असतात. यामुळेच त्यांचं धाडस होत चालला आहे, असा गंभीर आरोप धंगेकरांनी केला होता. त्याचबरोबर एबीपी माझाशी बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले, अनेकांनी माझी तक्रार केली पण मला एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) फोन आलेला नाही. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

अन्यथा दोन-दोन वर्षे हाती काहीच लागणार नाही, मनरेगाची आधीचीच 3 हजार कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत; मनेरगा मदतीवरून रोहित पवारांचा सवाल

Published at: 12 Oct 2025 05:07 PM (IST)
Continues below advertisement
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.