भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांकडून रत्नाकर गायकवाड यांना मारहाण झाल्याचं कळतं.
मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून रत्नाकर गायकवाड यांना मारहाण झाली. यादरम्यान गायवाड यांच्या पत्नीलाही मारहाणीचा प्रयत्न झाल्याचं समजतं.
याप्रकरणी बेगपुरा पोलिसांनी दोन महिला आणि चार पुरुष कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
दरम्यान, आंबेडकर भवन पाडल्याचा जनतेमध्ये राग आहे. परंतु रत्नाकर गायकवाड यांच्यावरील हल्ला ही दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या
दादरमधील आंबेडकर भवन जमीनदोस्त, नव्या वादाला तोंड
आंबेडकर भवन पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
आंबेडकर भवन पुर्नउभारणीची घोषणा गुपचूप का? : अजित पवार
आंबेडकर भवनात कोणीही प्रवेश करु नका, हायकोर्टाने ठणकावलं
आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईत विराट मोर्चा