Minister Shivendraraje Bhosale on Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) हे महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग करत असल्याची टीका मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (Minister Shivendraraje Bhosale) यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर कारवाईची सुरुवात अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यापासून करावी, त्यांना माफी नाही असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
कायदेशीर कारवाई झाली पाहिजे
आपलं भवितव्य विझायला लागलं की छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य करणं ही फॅशन झाली असल्याचे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. राहुल सोलापूरकर हे महाराष्ट्रात पेटवण्याचा उद्योग करत आहेत. त्याची उतरती कळा सुरु झाली असेल किंवा त्याचे भवितव्य विझायला लागले असेल यामुळे प्रकाशझोतात येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केलं की आपल नाव होते असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. त्यामुळं त्यांना माफी नाही, यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर सरकारंने कारवाई लवकरात लवकर करावी असे भोसले म्हणाले. याची सुरुवात राहुल सोलापूरकर यांच्यापासून करावी अशी मागणी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.
काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर?
"छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो." असे वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
VIDEO Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी, छत्रपतींचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं केलं स्पष्ट