एक्स्प्लोर

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांची आज 396 वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. तर शिवजन्म स्थळाच्या आतील भागातही सजावट करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले. शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह विविध मान्यवर शिवनेरीवर उपस्थित राहणार आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शिवाजी महाराजांची 30 हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी-

अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त एक भव्य आणि अनोखा उपक्रम पाहायला मिळालाय. अकोटमधील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने ही भव्य रांगोळी साकारली. तब्बल 30 हजार स्क्वेअर फुटांमध्ये रांगोळी काढण्यात आलीय. यामध्ये सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक प्रतिमा साकारण्यात आलीये… विशेष म्हणजे अवघ्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती उभी केलीये. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे आणि चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतून ही भव्य रांगोळी साकारली गेलीय. या रांगोळीसाठी तब्बल 40 क्विंटल रंग वापरण्यात आलाय. सर्वप्रथम मैदानाची आखणी करून प्रतिमेचे रेखाटन करण्यात आलेय.  त्यानंतर रंग भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गेल्या 5 वर्षांपासून महाविद्यालयात शिवजयंती साजरी केली जातेय.  एवढ्या मोठ्या आकाराची रांगोळी काढण्याचे हे सलग तिसरे वर्ष ठरलेय. ही कलाकृती साकारण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, चतुर्भुज आर्टचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी आठ दिवस अथक मेहनत घेतली. या भव्य उपक्रमामुळे आकोट शहरात शिवाजी महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लातुरात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा..तुताऱ्यांचा निनाद आणि फटाक्यांची आतिषबाजी-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात मध्यरात्री शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराज चौक येथे रात्री बारा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिका आयुक्त मानसी मीना, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ आणि उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांच्यासह उपस्थित महिलांनी बाळ शिवबांचा पाळणा झुलवला. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवरायांचा जयघोष दुमदुमला. तुताऱ्यांचा निनाद, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

भंडाऱ्यात शिवजयंतीच्या रॅलीत हातात तलवार घेतं केलं प्रदर्शन- (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज भंडारा शहरात सायंकाळी अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात शिवजयंतीची रॅली काढण्यात आली. मात्र, या रॅलीत एका लोकप्रतिनिधीच्या पतीनं हातात तलवार नाचवल्यानं सध्या शहरात चर्चेला उधाण आले आहे. भंडारा शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीत शिवकालीन युद्धकला, दांडपट्टा आणि विविध शारीरिक कवायतींचे सादरीकरण करण्यात आले. हजारो शिवभक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. रॅली रंगात आलेली असतानाच, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती कृष्णा उपरीकर हे चक्क हातात तलवार घेऊन रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. रॅली शहराच्या मुख्य बाजारपेठेतून आणि गजबजलेल्या मार्गावरून जात असताना उपरीकर यांच्या हातात उघडी तलवार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे अशा प्रकारे प्रदर्शन करणे कायद्याच्या चौकटीत बसते का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवभक्तांना द्या भरभरुन शुभेच्छा; महाराजांच्या शौर्याचं करा स्मरण, पाठवा 'हे' मेसेजेस

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांच्या सहभागानं अजिंक्यतारा उजळला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Nagpur News : नागपुरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय, सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला, गैरसमजुतीतून वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारलं, थोडक्यात बचावले प्राण
नागपुरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय, सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला, गैरसमजुतीतून वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारलं, थोडक्यात बचावले प्राण
Solapur Accident : सोबत रोजा इफ्तार केला, चहा पिण्यासाठी निघाले अन् काळानं झडप घातली; सोलापूर-विजापूर रोडवर भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
सोबत रोजा इफ्तार केला, चहा पिण्यासाठी निघाले अन् काळानं झडप घातली; सोलापूर-विजापूर रोडवर भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये गॅस वाहून नेणारे जहाज आढळलं, प्रशासनाकडून तपास सुरु
रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये गॅस वाहून नेणारे जहाज आढळलं, प्रशासनाकडून तपास सुरु
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
Embed widget