एक्स्प्लोर

संभाजीनगरच्या राजभोग हॉटेलमध्ये अस्वच्छतेचा कळस! FDAच्या धडक कारवाईनंतर परवाना निलंबित, सुरक्षेच्या 88 पैकी फक्त 18 गुण!

अन्न सुरक्षेच्या निकषांनुसार हॉटेलला 88 पैकी अवघे 18 गुण मिळाले असून, अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: गेल्या अनेक दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने अन्नसुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स कॅफे व टपऱ्या व दुकानांवर कारवायांचा धडाका लावला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील वडगाव कोल्हाटी परिसरातील महाराणा प्रताप चौक येथील ‘मे. राजभोग हॉटेल’वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आणि अस्वच्छता आढळून आल्याने प्रशासनाने 8 ऑक्टोबर 2026 रोजी हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला. अन्न सुरक्षेच्या निकषांनुसार हॉटेलला 88 पैकी अवघे 18 गुण मिळाले असून, अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

तपासणीत स्वयंपाकघरातील अस्वच्छता उघड

राज्यात राबवण्यात येत असलेल्या ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांनी 7 ऑक्टोबर 2026 रोजी राजभोग हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. या तपासणीत राजभोग हॉटेलचे स्वयंपाकघर अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळले. स्वयंपाकघरातील फरशी खराब होती, तसेच खिडक्या आणि दरवाज्यांमधून कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली नव्हती.

अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा तपासणी अहवालही उपलब्ध नव्हता. कच्चे आणि शिजवलेले अन्न तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ यांची योग्य विलगीकरणाशिवाय साठवणूक केली जात असल्याचे तपासणीत समोर आले.

रेफ्रिजरेशन, स्वच्छता आणि कीटक नियंत्रणात त्रुटी

हॉटेलमध्ये रेफ्रिजरेशन आणि योग्य व्यवस्थेचा अभाव आढळला. याशिवाय कचरा व्यवस्थापन, नियमित स्वच्छता आणि कीटक नियंत्रणासंबंधीच्या नियमांचेही पालन केले जात नसल्याचे प्रशासनाच्या तपासणीत निदर्शनास आले. या त्रुटींमुळे अन्न दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

हॉटेलचा परवाना निलंबित

गंभीर त्रुटींची दखल घेत सक्षम प्राधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील तरतुदींनुसार हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार हॉटेलमधील अन्न उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक आणि ग्राहकांना अन्नसेवा देण्याचे काम तातडीने बंद करण्यात आले आहे. तपासणीत आढळलेल्या सर्व त्रुटी दूर केल्यानंतर प्रशासनाकडून पुनर्तपासणी केली जाईल. तसेच परवाना निलंबन उठविण्याचा स्वतंत्र लेखी आदेश मिळेपर्यंत हॉटेल पुन्हा सुरू करता येणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Diwali : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Embed widget