Chhagan Bhujbal :  सामाजिकरित्या मागासलेल्या लोकांना आरक्षण आहे. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असे वक्तव्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं. पाच हजार वर्षे जे दाबले गेले त्यांच्यासाठी सामाजिक आरक्षण आहे. आर्थिक आणि शैक्षणिकरित्या जे मागास आहेत, त्यांच्यासाठी मोदी साहेबांनी EWS आणल्याचे भुजबळ म्हणाले. काही लोक म्हणजे महाराष्ट्रातील मराठा, गुजरात येथील गुजर, पुढे जाट यांची लढाई सुरु आहे. पण ते सामाजिक रित्या मागास नाहीत. त्यांच्यासाठी EWS आहे असं भुजबळ म्हणाले. 

Continues below advertisement

आरक्षण हे सामाजिक दृष्टीने मागासलेल्यांना आहे

अजूनही आम्ही लढत आहे, जे संविधान लिहलं त्यानुसार ओबीसी दलित आदिवासी यांना आरक्षण दिले आहे. आरक्षण हे सामाजिक दृष्टीने मागासलेल्यांना आहे, असे भुजबळ म्हणाले. आणखी लोक ओबीसीत आरक्षण बसले तर बाजूला जावे लागेल, तीच परिस्थिती आरक्षणाची आहे, बाहेर काढणार नाही पण आणखी लोक सोबत येत आहे. अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक झाली त्यामध्ये 84 पोलीस जखमी होते. यात पोलिसांनी लाठीचार्जचा आदेश दिला. पवारसाहेबांना माहीत नव्हतं पोलीस जखमी झाले म्हणून ते गेले होते. त्यामुळं उद्धव ठाकरेही गेले होते. त्यामुळे जरांगे मोठा झाला, जनतेने कार्यक्रम केला होता, थेट घरात बसवला, समजने वाले को इशारा काफी है असे भुजबळ म्हणाले. निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो. त्यामुळे जो जो जरांगेला पाठिंबा देतो त्याला निवडणुकीत धडा शिकवा असं भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "तुम्ही एकत्र आला तर काहीही अशक्य नाही. माझ्या निवडणुकीवेळी जरांगे दोन दिवस आला. मला मराठ्यांची मतं मिळाली नाहीत. पण ओबीसी, एसटी, एससी आणि सर्व जाती माझ्या सोबत आल्या, मी जिंकलो."

आम्ही कायदा हातात न घेता मुंबईत आंदोलन करु 

आम्ही कायदा हातात न घेता मुंबईत आंदोलन करु असे भुजबळ म्हणाले. मला पडण्यासाठी जरांगे दोन दिवस येवल्यात येऊन बसले होते असे भुजबळ म्हणाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना भुजबळ म्हणाले की, कोणीही मुद्दा मांडताना चांगली भाषा बोला, काही लोकांच शिक्षण नाही, ते काहीही शब्द वापरतात असेही ते म्हणाले. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Chhagan Bhujbal : अंतरवालीच्या दंगलीत शरद पवारांचा आमदार, भुजबळांचा आरोप; मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस एकमेव आशेचा किरण, मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने