Chhagan Bhujbal :  अशोक  खरातने नाशिकचे नाव खराब केले आहे. नाशिकमध्ये गोदावरी आहे, रामकुंड आहे. लोकं अस्थी  विसर्जनासाठी येथे येतात. नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. या गोष्टीमुळं नाशिकच्या पावित्र्याला धक्का लागल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. हे असे काही चाललेले उद्योग निश्चितपणे बंद होतील असे भुजबळ म्हणाले. जिथे जिथे ज्यांनी कायदा हातात घेतला आहे, अत्याचार केलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. ज्यांनी चुकीचं काम केलं निश्चितपणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील असे भुजबळ म्हणाले. 

Continues below advertisement

बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याबद्दल काँग्रेसचे आभार

बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याबद्दल मी सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचे आभार मानतो. हर्षवर्धन सपकाळ यांना मी स्वतः फोन केला होता आणि विनंती केली होती. त्यांनी मान देऊन या निवडणुकीतून माघार घेतली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे व सर्व काँग्रेस नेत्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो असे भुजबळ म्हणाले. निवडणुकीतून माघार घेतली याचा अर्थ असा की त्यांनी रस्ता मोकळा करुन दिला. सुनेत्राताई पवार यांच्या घड्याळावर मत पडणार आहे. जय पवार स्वतः बारामतीमध्ये बसून लोकांची समजूत काढत आहेत. दीड वाजेपर्यंत 18 ते 20 लोकांनी उमेदवारीतून माघार घेतली होती, त्यानंतर काय झाले माहीत नाही असे भुजबळ म्हणाले. 

काँग्रेस पक्ष देशव्यापी आहे. पवार साहेबांनी सुरुवातीला जाहीर केलं होतं की आम्ही उमेदवार उभे करणार नाही. उद्धव ठाकरेंनी सांगितले की आम्ही निश्चित बरोबर आहोत. भाजपच्या नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. मुख्यमंत्री स्वतः उभे राहिले चंद्रशेखर बावनकुळे स्वतः फॉर्म भरण्यासाठी आले होते. रामदास आठवले आणि सर्वांनीच पाठिंबा दिल्याचे भुजबळ म्हणाले. करुणा शर्मा यांच्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, मला काही कल्पना नाही त्यांनी माघार घेतली का नाही.असे भुजबळ म्हणाले. 

Continues below advertisement

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता महिला आरक्षणाचे काम हाती घेतलंय

लोकसभेत महिलांना आरक्षणाच्या संदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की, मी फार खुश आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांची 200 जन्मशताब्दी वर्ष सुरु होते. फुले दाम्पत्यांनी महिला सक्षमीकरणाचे काम हाती घेतलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता महिला आरक्षणाचे काम हाती घेतले आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा चर्चेला होता. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिला सक्षमीकरणाचे पहिले पाऊल उचलले होते. मालेगाव -मनमाड -येवला शहरातील वाहतूक कोंडीबाबात बोलताना भुजबळ म्हणाले की, मी पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोललो. अपघात होत आहेत. दोन -दोन तास वाहतूक मोकळी होत नाही. 

अवकाळी पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. याबाबत बोलताना भुजभळ म्हणाले की, या संदर्भात मी मंत्रिमंडळामध्ये चर्चा केली आहे. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. यात वेगवेगळ्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. एकूण किती नुकसान आहे त्याचा आढावा घेऊन त्याबद्दल शेतकऱ्यांना सरकार मदतीचा निर्णय घेईल असे भुजबळ म्हणाले. 

गेल्या दहा-बारा वर्षे रॉकेल वाटप बंद केले होते. त्यावेळी रॉकेल वाटप केंद्राचे मोठे डीलर हे पूर्णपणे संपले आहे. आपण सर्वांना कळवले होते. काही रॉकेल वाटप केंद्र असतील तर त्यांनी ताबडतोब पुढे आले पाहिजे की त्यांना आपण लगेच परवाने मंजूर केले. आणखी कोणाला परवाने पाहिजे असेल तर आपण 24 तासांमध्ये रॉकेलचे परवाने देणार आहोत. 100 एक डीलर्स महाराष्ट्रमध्ये पुढे आले. रॉकेल वाटपाचे काम सुरु झाले आहे.