Chhagan bhujbal In Majha katta : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यंत्री छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर विशेष मुलाखत दिली. 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी खास संवाद साधला आहे. मागील पाच दशकात देशातील आणि राज्यातील राजकारण आणि समाजकारण छगन भुजबळ यांनी खूप जवळून पाहिले आहे. ज्या  पक्षातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली, त्या शिवसेनाच्या सध्याच्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालेय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आहे.  पण तीस वर्षांपूर्वी 1991साली शिवसेना नेतृत्वाला असेच आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं होतं. शिवसेना ते राष्ट्रवादी व्हाया काँग्रेस या प्रवासात छगन भुजबळ यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले आहेत. नगरसेवक ते गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदं छगन भुजबळ यांनी भूषवली आहेत. छगन भुजबळ यांच्यातील राजकीय नेता घडवणारी शिवसेना सध्या सर्वात कठीण काळातून जात आहे. तर छगन भुजबळ यांच्या राष्ट्रवादी पक्षासमोरही मोठी आव्हानं आहेत. या सर्वांविषय छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर उत्तरं दिली आहेत.