पंढरपूर : पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी मूर्तीवर पुन्हा रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विठुरायाच्या मूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपन करण्यात येणार आहे.


मंदिर समितीने पुरातत्व विभागाशी यासंदर्भात संपर्क केलाय. अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेल्या विठुरायाच्या मूर्तीची झीज होणं ही भक्तांसाठी चिंतेचा विषय आहे. गेली 10 वर्ष पुरातत्व विभागाच्या सूचनांचं पालन होत नसल्याने मूर्तीची झीज वाढली आहे.

विठूरायाची स्वयंभू मूर्ती वालुकाशम दगडाची असून गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तीवर महापूजांमुळे रासायनिक क्रियेमुळे झीज होते. 2010 सालापासून  महापूजा बंद करण्यात आल्या होत्या.

शिवाय दोन वेळा मूर्तीवर वज्रलेपाची प्रक्रिया झाली असून आता पाच वर्षानंतर वज्रलेपन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे. याला मंदिर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.