एक्स्प्लोर

Chembur Accident Report: 'चेंबूरमध्ये झाड कोसळून विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला? मुंबई महापालिकेचा चौकशी अहवालातून कारण समोर; 'Act of God'चा उल्लेख

Chembur School bus Accident Report: चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाल्याप्रकरणी (Chembur Accident Report) मोठी अपडेट समोर आली आहे.

Chembur School bus Accident Report: चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाल्याप्रकरणी (Chembur Accident Report) मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिकेचा चौकशी अहवाल समोर आला असून माजी कुलगुरू प्रा. संजय व्ही. देशमुख यांनी चार खंडांचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. या दुर्घटनेमागे एकच कारण निश्चित करता येत नसल्याचे सांगत अहवालात 'Act of God' असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेवेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने पार्क होती, त्यामुळे बसचा वेग कमी झाला असावा, असे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. तसेच झाडांच्या मुळांजवळील खोदकाम, रस्ते बांधकाम, भूमिगत वाहिन्या आणि हवामानाचा परिणाम यांचा नियमित अभ्यास करण्याची शिफारस देखील यात करण्यात आली आहे. (Chembur School bus Accident Report Controversy)

दरम्यान, मुंबईतील झाडांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने व्यवस्थापनात व्यापक बदल करण्याची गरजही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Chembur Tree Collapse : काय आहे नेमके प्रकरण?

चेंबूर येथील डायमंड गार्डन (Diamond Garden) परिसरात 30 जून 2026 रोजी एका शाळेच्या बसवर पिंपळाचे मोठे झाड कोसळले होते. या भीषण अपघातात (Accident) एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. याप्रकरणी प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला आहे.या अहवालात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली असून, पर्जन्य जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला 5 लाख रुपये आणि सल्लागार संस्थेला 2 लाख रुपये दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि वाऱ्यामुळे झाड पडल्याचे सांगत नैसर्गिक कारणांवर बोट ठेवण्यात आले आहे.

Chembur Tree Collapse: आमच्या मुलाच्या हत्येला BMC जबाबदार; चेंबूर दुर्घटनेतील विहानचे पालक आक्रमक

मुंबईतल्या चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा वर्षांच्या विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला. त्यामुळं विहानच्या आईवडीलांवर आधीच दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण या प्रकरणात मुंबई महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीनं दिलेल्या अहवालानं श्रीवास्तव दाम्पत्याला आणखी एक धक्का बसला. या चौकशी समितीच्या अहवालात महापालिका अधिकाऱ्यांसह उद्यान विभागाला क्लीन चिट देण्यात आली होती. त्यामुळं या प्रकरणात पुन्हा चौकशी करावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल अशी प्रतिक्रिया श्रीवास्तव दाम्पत्यानं एबीपी माझाशी बोलताना दिली होती.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
Kolhapur : 'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
स्वस्तात साडी खरेदी करण्याचं आमिष! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल 
स्वस्तात साडी खरेदी करण्याचं आमिष! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget