Chandrashekhar Bawankule : अमरावतीत (Amravati) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या गाडीवर सोयाबीन (soybean) फेकल्याची घटना घडली. यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्षाची ही कृती बरोबर नाही. मला निवदेन घ्यालया बोलवले असते तर मी आलो असतो असेही बावनकुळे म्हणाले. गाडी अडवणे, काळे झेंडे दाखवणे, मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल जशास तसे करावे लागेल. सरकारशी काम आहे तर मला निवेदन द्यायला पाहिजे. गाड्या अडवणे बरोबर नाही. यानंतर असं झालं तर ते सहन केलं जाणार नाही असेही बावनकुळे म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे भेट घेऊन राज्यासाठी भरीव मदतीची मागणी करणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत.
कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मोठ्या प्रमाणावर पंचनामे अपलोड होणे सुरु आहेत, त्यामुळं ई-केवायसीसंदर्भात कोणता प्रश्न निर्माण झालेला आहे, या संदर्भात मी आयटी विभागाशी बोललो आहे. कृषी मंत्रालय व आयटी विभाग यावर तोडगा काढत असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली नाही मात्र त्यांचे पंचनाम्यात जर नाव नसेल तर त्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही कोणताही शेतकरी मदतीविना वंचित राहणार नाही असे बावनकुळे म्हणाले.
राहुल गांधींवरही टीका
केंद्र सरकारकडून मदत घेऊन कर्जमाफी का दिली जात नाही? यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आठ हजार रुपये खटाखट खटाखट देऊ अशी घोषणा केली होती, मात्र मोदी यांनी व्यवसायावर आधारित योजना तयार केली. महिलांना दहा हजार रुपये प्रति महिना रोजगार दिला आहे. 75 लाख महिलांना स्वयंरोजगाराकरता मदत केली आहे. आमचं सरकार महिलांना मदत देतय. मात्र, उद्धव ठाकरे यांचा सरकार असताना त्यांना महिलांना मदत देण्यापासून कुणी थांबवले होतं? असा सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
50 हजार रुपये प्रति एकर मदत द्यावी उद्धव ठाकरे यांची मागणी, बावनकुळे म्हणाले...
हे लोक बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत खोटे बोलणारे लोक आहेत, हे लबाड आहेत. या राज्यात जेव्हा जेव्हा संकट आला तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने शेतकऱ्यांना मदत केल्याचे बावनकुळे म्हणाले. काँग्रेसच्या सरकारमध्ये केवळ शेतकऱ्यांसोबत लबाड गिरी झाली. आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही. शेतकऱ्यांसाठी जेवढी मदत द्यावी तेवढं कमी आहे. हा काळ आरोप प्रत्यारोपाचा नसून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना काय देता येईल याचा विचार करावा असे बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
महसूल सेवकांच्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा आठवा दिवस, राज्यभरातील 12 हजार 600 सेवकांचे काम बंद; आदोलकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा