एक्स्प्लोर

बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा! उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया डिजिटल होणार, मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया डिजिटल होणार आहे.

Chandrashekhar Bawankule :  राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया डिजिटल होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बावनकुळे यांनी क्रेडाईचे सर्व प्रश्न लावले मार्गी लावले आहेत. बिनशेतीसाठी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही. ही प्रक्रिया दहा दिवसात ऑनलाईन करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. 

बांधकाम करताना उत्खनन करण्यात आलेले गौण खनिज त्याच जागी वापरले तर त्याला रॉयल्टी माफ करण्यात आली असून, बिनशेतीसाठी आता जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नसून ही प्रक्रिया दहा दिवसात ऑनलाईन करण्यात येणार आहे. याबरोबरच महापालिका आणि मिळकतपत्रावरील नोंदीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणारे प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात क्रेडाईच्या (CREDAI) प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ​

उत्खननानंतर निघालेले गौणखनिज जर त्याच बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी वापरले तर रॉयल्टी आकारली जाणार नाही

बांधकाम करताना होणाऱ्या खोदकामासाठी आकारल्या जाणाऱ्या रॉयल्टीबाबत क्रेडाईने मांडलेले प्रश्न महसूलमंत्र्यांनी मार्गी लावले आहेत. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, उत्खननानंतर निघालेले गौणखनिज जर त्याच बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी वापरले जात असेल, तर त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, रॉयल्टी भरण्याची प्रक्रिया आता अधिक सुटसुटीत करून ती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​बिनशेतीची डिजिटल प्रक्रिया आता 10 दिवसांत 

​बिगरशेती (NA) परवान्यासाठी लागणारा वेळ व क्लिष्ट प्रक्रिया कमी करण्यासाठी महसूल विभागाने कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. एनएची संपूर्ण पद्धत येत्या दहा दिवसांत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे गृहप्रकल्पांच्या कामात येणारे प्रशासकीय अडथळे दूर होतील.

​ पुणे पॅटर्नचा राज्यभर विचार; डिजिटल ट्रेकिंगवर भर 

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेली 'डिजिटल ट्रेकिंग प्रणाली' यशस्वी ठरली आहे. हीच पारदर्शक प्रणाली आता राज्यभर राबवण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय, कोणत्याही कागदपत्राचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) झाल्यास त्याची नोंद तातडीने मिळकत पत्रिकेवर (Property Card) झालीच पाहिजे, ही क्रेडाईची मागणीही मंत्र्यांनी तत्वतः मान्य केली आहे. ​या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि जमाबंदी आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्यासोबत स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, तांत्रिक बाबी लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास क्रेडाईकडून व्यक्त करण्यात आला.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saoner DNA Corridor: ‘डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादनास मंजूरी; संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल
सावनेर येथे प्रस्तावित ‘डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादनास मंजूरी; संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल
Sharad Pawar Varkari Community Controversy: मौलाना शरद पवारांना वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय, तुम्ही जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडता तेव्हा...; तुषार भोसलेंची घणाघाती टीका
मौलाना शरद पवारांना वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय, तुम्ही जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडता तेव्हा...; तुषार भोसलेंची घणाघाती टीका
Maharashtra Live blog updates: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या वाटपावर सवाल
Maharashtra Live blog updates: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या वाटपावर सवाल
Krishnaraaj Mahadik on Nashik IT Company Conversion case: नाशिक धर्मांतर प्रकरणात भाजप युवा मोर्चा आक्रमक, कृष्णराज महाडिकांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'महिलांच्या सुरक्षेसाठी...'
नाशिक धर्मांतर प्रकरणात भाजप युवा मोर्चा आक्रमक, कृष्णराज महाडिकांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'महिलांच्या सुरक्षेसाठी...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Embed widget