एक्स्प्लोर

निवडणुकीनंतरच लाडक्या बहिणींना 3000 द्या, काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र; मंत्री बावनकुळे म्हणाले..

महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पैसे वितरीत करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावरुन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केलीय.

निवडणुकीनंतरच लाडक्या बहिणींना 3000 द्या, काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र; मंत्री बावनकुळे म्हणाले..Chandrashekhar Bawankule on Congress :
महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पैसे वितरीत करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबात आयोगाला तसे पत्र देखील दिले आहे. याच मुद्यावरुन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचा लाडकी बहिणी द्वेषाचा क्रूर चेहरा उघड झाल्याचे बावनकुळे यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाले बावनकुळे?

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. तो वरचेवर उफाळून येतो. आमच्या माता- भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळी ही योजना बंद करा म्हणून काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. 

नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा

आता तर, काँग्रेसने हद्द पार केली आहे. बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात. बहिणींच्या संसाराला आधार मिळतो. हातभार लागतो. माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तर,पुन्हा काँग्रेसवाल्यांचा द्वेष, मत्सर, आकस उफाळून आला असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. काँग्रेसवाल्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींना देऊ नका, असे पत्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा, आता सर्वांसमोर आली असल्याचे बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करत आहे. ही रक्कम लाडक्या बहिणींना देऊ नका, म्हणून काँग्रेसने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचे बावनकुळे म्हणाले. आम्ही काँग्रेसच्या विकृत कृतीचा निषेध करीत आहोत. काँग्रेसला या राज्यातील आमच्या माता भगिनी कधीही माफ करणार नाहीत असे बावनकुळे म्हणाले. काँग्रेसचा खरा चेहरा आता पुढे आला असल्याचे बावनकुळे म्हणाले.

काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन ममहिन्यांचे 3000 रुपये एकत्रीत देण्याचा घाट सरकारने घातला आहे. ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावीत करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारुढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामुहीक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. 

लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही, पण पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत

लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 चे लाडकी बहिण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच असे निर्देश आयोगाने शासनास द्वावेत असी विनंती पत्राद्वारे काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.  

लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस ‘लाच’ म्हणते..? चित्रा वाघ यांची टीका

लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस ‘लाच’ म्हणते..? अशी टीका भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. निवडणूक लागली म्हणून हक्काचा पैसा रोखण्याचा त्यांचा हा घाणेरडा डाव आहे. ज्यांनी आयुष्यभर बहिणींना उपेक्षित ठेवलं अशा सावत्र भावांना लाडक्या  बहिणी 15 तारखेला सडेतोड उत्तर देतील अशी टीका वाघ यांनी केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
Ajit Pawar Pune Metro: पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
Ajit Pawar Pune Metro: पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकिल नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकिल नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटलांचा व्हिडिओ बॉम्ब; मतदानापूर्वी कोल्हापूरच्या सत्ताधारी आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ जारी
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटलांचा व्हिडिओ बॉम्ब; मतदानापूर्वी कोल्हापूरच्या सत्ताधारी आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ जारी
अभिनेत्री किशोरी शहाणेच्या कारला धडक; ठाणे-मुंबई मार्गावर नेमकं काय घडलं? VIDEO शेअर करत संताप व्यक्त
अभिनेत्री किशोरी शहाणेच्या कारला धडक; ठाणे-मुंबई मार्गावर नेमकं काय घडलं? VIDEO शेअर करत संताप व्यक्त
लाडक्या बहिणींनो बँक खातं चेक करा, संक्रांतीआधीच पैसे जमा झाले; आचारसंहितेच्या कात्रीतून सुटका
लाडक्या बहिणींनो बँक खातं चेक करा, संक्रांतीआधीच पैसे जमा झाले; आचारसंहितेच्या कात्रीतून सुटका
Embed widget