Chandrapur News : चंद्रपूरजिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेस नेते आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू माजी जि. प. अध्यक्ष सतीश वारजुरकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं राजीनामा पत्रात दोन्ही नेत्यांनी केलं आहे.

Continues below advertisement

वारजूरक बंधूंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती

वारजूरक बंधूंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. चिमूर मतदार संघाचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांची भेट आगामी काळात या दोघांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यातच आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने वारजूरकर बंधू भाजपच्या तंबूत दाखल होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार बंटी भांगडिया यांनी सतीश वारजूरकर यांना पराभूत केले होते. 

हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपचा धक्का, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांचे पुत्र भाजपमध्ये

हिंगोलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपने मोठा धक्का दिला आहे.  हिंगोलीतील नेते व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश होणार आहे. आतिष दांडेगावकर यांचा उद्या नवी मुंबई येथे सकाळी आठ वाजता पक्ष प्रवेश पार पडणार  आहे. हिंगोलीतील राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते देखील दांडेगावकर यांच्या समवेत दाखल होत शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

Continues below advertisement

गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षात सातत्याने पक्ष प्रवेश सुरु

गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षात सातत्याने विरोधी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. विशेष भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होताना दिसत आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकानंतर महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं अनेक नेते पदाधिकारी भाजपमध्ए प्रवेश करत आहेत. विशेषत: गेल्या काही दिवसात काँग्रेसला मोठे हादरे बसले आहेत. त्यांचे अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला हात सोडला आहे. अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश कर भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut vs Sandeep Deshpande: चंद्रपूर प्रकरणावर संदीप देशपांडेंकडून थेट संजय राऊतांना लक्ष्य; कारण काय?, जाणून घ्या, 'राज'कारण!