चंद्रपूर :चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर धावणाऱ्या डिझेलच्या टँकरखाली झोकून देत एका मजुराने आत्महत्याकेली आहे. बल्लारपूर शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. मृताची ओळख भैरव खेडू ठाकूर (40) अशी पटली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाही.

घाबरलेल्या टँकर चालकाने घटनास्थळावरुन काढला पळ

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मजूर बिहारचा रहिवासी असून तो बांधकामावर मजूर म्हणून काम करत होता. काल दुपारी एक डिझेल टँकर राजुरा शहराच्या दिशेने जात होता, तेव्हा रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसलेल्यांपैकी एकाने उठून थेट टँकरच्या पुढच्या चाकासमोर स्वतःला झोकून दिले. टँकरचे पुढचे चाक त्याच्या अंगावरुन गेल्यानं त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं घाबरलेल्या टँकर चालकाने तात्काळ टँकर थांबवला आणि तो घटनास्थळावरुन पळून गेला. आत्महत्येमागील कारण अज्ञात असून पोलीस तपास करत आहेत.

भंडाऱ्याच्या साकोली न्यायालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू

एका आरोपीला न्यायालयात पेशीवर नेलं असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली न्यायालयात आज दुपारी घडली. किशोर शेळके (५५) असं मृत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचं नावं आहे. किशोर शेळके हे भंडारा पोलीस मुख्यालयाच्या बँड पथकात कर्तव्यावर असून आज साकोली पोलीस ठाणे अंतर्गत एका गुन्ह्यातील आरोपीला त्यांनी भंडारा जिल्हा कारागृहातून साकोली न्यायालयात पेशीवर नेलं होतं. शेळके यांना यावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारापूर्वीचं त्यांचा मृत्यू झाला.

रेती माफीयाने शेतकऱ्यावर उगारली कुऱ्हाड

बुलढाणा जिल्ह्यात रेती माफीयांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील वडनेर भोलजी येथील शेतकरी शेर खान आमिर खान हे त्यांच्या शेतात गेले असता परिसरातील वाळूमाफिया असलेला एजाजखान मिलखान व जावेद खान मिल खान यांनी शेतकरी शेरखान यांना कुराडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. घटनास्थळी दोघांमध्ये वाद होऊन एजाज खान यांनी शेतकऱ्यावर चक्क कुऱ्हाड उगारली आहे. याप्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये एजाज खान व जावेद खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! छातीत गोळी लागून तरुणाचा मृत्यू; हत्या की आत्महत्या गूढ कायम, बीडमध्ये खळबळ