धुळे : धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी चंद्रकांत सोनार विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महापौर पदाच्या उमेदवार मंगला अर्जुन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपचे चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
महापौर, उपमहापौर निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं याठिकाणी भाजपचे महापौर, उपमहापौर निवडून आले आहेत.
धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढली.
भाजपने 50, काँग्रेसने सहा, तर राष्ट्रवादीने आठ, (आघाडी एकूण 14) जागा जिंकल्या. एमआयएमने चार जागांवर खातं उघडलं. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसंग्रामला केवळ एक जागा जिंकता आली, तर बसपलाही एकच जागा खिशात घालता आली. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो-पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे या भाजपच्या तीन मंत्र्यांनी धुळ्यात तळ ठोकला होता.
महाजन-गोटे यांची खडाजंगी
धुळ्यातील भाजपच्या विजयानंतर मंत्री गिरीश महाजन आणि अनिल गोटे यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती. भाजपने ईव्हीएममध्ये घोटाळे करुन विजय मिळवल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला होता. भाजप गुंडांचा पक्ष असून बाहेरुन आणलेल्या गुंडांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
संबंधित बातम्या
महानगरपालिका निवडणूक : धुळ्यात 60 तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान
Dhule Election Update : 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज
अहमदनगर, धुळ्यात मतदारांचा कौल कुणाला?
महापालिका निवडणूक : धुळ्यात आमदार गोटे यांच्या गाडीवर दगडफेक, मतदानाला सुरुवात
धुळे महानगरपालिकेसाठी उद्या मतदान, प्रशासन सज्ज
धुळ्याच्या महापौरपदी चंद्रकांत सोनार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Dec 2018 12:03 PM (IST)
धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -