एक्स्प्लोर

भाजपला सोपं जावं म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले, चंद्रकांत खैरेंचा आरोप

उमेदवारी देण्याच्या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)  यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Chandrakant Khaire :  महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Mahanagar Palika Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली आहे. कुठं युत्या तर कुठं आघाड्या झाल्या आहेत. तर कही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट वाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटात चांगलच वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)  यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपला सोपं जावं म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापल्याची टीका खैरे यांनी केली आहे. 

भाजप नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही महिलांनी नाराजी व्यक्त केली

भाजप नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही महिलांना तिकीट न मिळाल्याने रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी चंद्रकांत खैरे यांनाच जाब विचारला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी काही महिला इच्छुक होत्या. मात्र, त्यांना तिकीट मिळालं निसल्याने या महिलांनी चंद्रकांत खैरे यांना जाब विचारला. यावेली महिला रडत असल्याचंही पाहायला मिळालं. 

अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी, चंद्रकांत खैरे आक्रमक

काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटाच प्रवेश केला आहे. त्यानंतर  अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. यावरुन देखील चंद्रकांत खैरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मी मामुच्या प्रचाराला जाणार नाही. हे टीकोजीराव दानवे यांनी केले आहे. आज यादी सामनात पहिली. मला विचारलं नाही . हा माझा अपमान आहे.  अंबादास दानवे ठरवून करतो. मी पक्ष उभा केला पैसा खर्च केला असे खैरे म्हणाले.  

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू (Former mayor Rashid Khan) यांना उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला होता. यानिमित्ताने पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध अंबादास दानवे असा सुप्त संघर्ष रंगला होता. अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने मुंबईतील शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) रशीद मामू (Rashid Mamu) यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यावेळी  भवन इमारतीच्या दारात चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांना फटकारले होते. मी तुला उमेदवारी मिळून देणार नाही.  माझा तुला विरोध आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामूंना सगळ्यांदेखत सुनावले होते. यावेळी रशीद मामू यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, चंद्रकांत खैरे त्यांना बरेच काही बोलले होते. मात्र, आता याच चंद्रकांत खैरे यांच्या विरोधानंतरही अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. रशीद मामू यांना उमेदवारी दिल्यावर पाहा मी काय करतो, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला होता. त्यामुळे आता चंद्रकांत खैरे काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील या वादाचा फटका निवडणुकीत ठाकरे गटाला बसणार का, हेदेखील पाहावे लागेल.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Embed widget