पुणे : कोथरूडमध्ये भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी २५ हजाराहून अधिक मते मिळवत विजय मिळवला आहे. पाटील यांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचा पराभव केला. कोथरूडमधून उमेदवारी जाहीर केल्यापासून पुण्यासह राज्याचे लक्ष या लढतीकडे होते. पाटील यांना आघाडीचा पाठिंबा होता.
चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. शेवटच्या क्षणी त्यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. कोथरूड हा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. २०१४ मधील निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
पाटील हे पुण्याबाहेरील उमेदवार असल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. पाटील यांना भाजपने कोथरूडमधून उमेदवारी दिल्यावर त्यावर अनेकांनी जोरदार टीका केली होती. कोथरूडमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेरचा उमेदवार नको म्हणून नाराजी व्यक्त केली होती.
विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांना आधी एखाद्या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे, असा टोला लगावला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांना मतदारसंघातून निवडून येण्याचे आव्हान दिले होते. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्यावर पुन्हा एकदा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघाची निवड केली म्हणून टीका झाली होती. कोथरूड बाहेरचा उमेदवार नको म्हणूनही विरोधकांनी या मतदारसंघात प्रचार केला. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने कोथरूडमध्ये आपला उमेदवार न देता मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती.
Assembly Election 2019 : कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील विजयी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2019 05:24 PM (IST)
पाटील हे पुण्याबाहेरील उमेदवार असल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. पाटील यांना भाजपने कोथरूडमधून उमेदवारी दिल्यावर त्यावर अनेकांनी जोरदार टीका केली होती. कोथरूडमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेरचा उमेदवार नको म्हणून नाराजी व्यक्त केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -