मुंबईः मुंबई ते कोल्हापूर या विमानसेवेला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवी दिल्लीत मंगळवारी झालेल्या बठकीत हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र कोल्हापूर विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी रुपयांचा निधी देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दर्शविली आहे.


कोल्हापूर विमानतळाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत आज नवी दिल्लीत एक महत्त्वाची बठक पार पडली. राज्य शासन, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, हवाई वाहतूक मंत्रालयाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

मुंबई ते कोल्हापूर या 42 आसनव्यवस्था असलेल्या विमान सेवेला मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे कोल्हापूर ते मुंबई हे हवाई वाहतुकीचे बऱ्याच वर्षांपासूनचे करवीरवासियांचे स्वप्न सत्यात उतरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

विमानतळाचं आधुनिकीकरण रखडणार?

कोल्हापूर विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी रुपयांचा निधी देण्यास मात्र केंद्र शासनाने असमर्थता दर्शविली आहे. विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटींच्या निधीचा प्रस्ताव देण्यात आला.

मात्र एका विमानतळासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करणं सध्या शक्य नसल्याचं सांगत केंद्राने निधीसाठी नकार दिला.