Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवर (Central Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आसनगाव ते कसारा (Asangaon to Kasara) दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी आणि कसारा यार्डातील 'अप' यार्ड लाईनच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून 7 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2026 दरम्यान 12 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, 10 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2026 या कालावधीत कसारा मार्गावरील उपनगरीय तसेच मेल व एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

Continues below advertisement

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण ते कसारा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या विस्ताराचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे भविष्यात मेल/एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे स्वतंत्र होईल. परिणामी गाड्यांच्या वेगाला आणि हालचालींना गती मिळेल, तसेच अतिरिक्त गाड्या चालवणे शक्य होईल. या कामासाठीच हा ब्लॉक अत्यंत आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

10 ते 13 ऑक्टोबर 2026: ब्लॉकचा कालावधी अन् वेळ

10 ऑक्टोबर (शनिवार): दुपारी 3:35 ते रात्री 9:35 वाजेपर्यंत

Continues below advertisement

11 ऑक्टोबर (रविवार): सकाळी 11:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत

12 ऑक्टोबर (सोमवार) व 13 ऑक्टोबर (मंगळवार): दुपारी 3:35 ते रात्री 8:35 वाजेपर्यंत

प्रभावित मार्ग: कसारा - खर्डी (Khardi) आणि उंबरमाळी (Umbarmali) - कसारा दरम्यानची 'अप' मेन लाईन (प्लेटफॉर्म क्र. 1, 3, 4 आणि 'अप' यार्ड).

लोकल वाहतुकीवरील परिणाम 

ब्लॉकच्या काळात आसनगाव ते कसारा दरम्यान उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे बंद राहील.

1. 10, 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी CSMT वरून दुपारी 13:10, 14:17, 14:46 आणि 16:50 वाजता सुटणाऱ्या 'CSMT - कसारा' लोकल कसारा ऐवजी आसनगाव (Asangaon) स्थानकापर्यंतच चालवल्या जातील.

कसारा येथून सुटणाऱ्या 15:35, 16:16, 17:02 आणि 18:17 च्या लोकल अनुक्रमे 16:12, 16:54, 17:39 आणि 18:54 वाजता आसनगाव स्थानकातून CSMT कडे रवाना होतील.

10 ऑक्टोबर रोजी कसारा येथून रात्री 20:15 वाजता सुटणारी लोकल 20 मिनिटे उशिराने सुटेल.

2. 11 ऑक्टोबर रोजी CSMT वरून दुपारी 13:10, 14:17 आणि 14:46 वाजता सुटणाऱ्या लोकल आसनगावपर्यंतच धावतील.

कसारा येथून 15:35, 16:16 आणि 17:02 वाजता सुटणाऱ्या लोकल आसनगाव येथून अनुक्रमे 16:12, 16:54 आणि 17:39 वाजता सुटतील.

कसारा येथून सायंकाळी 18:17 वाजता सुटणारी लोकल 13 मिनिटे उशिराने सुटेल.

ब्लॉकपूर्वीची आणि ब्लॉकनंतरची पहिली व शेवटची लोकल

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल:

CSMT ते कसारा (डाऊन मार्ग): दुपारी 12:30 वाजता सुटेल.

कसारा ते CSMT (अप मार्ग): दुपारी 14:42 वाजता सुटेल.

ब्लॉकनंतरची पहिली लोकल:

CSMT ते कसारा (डाऊन मार्ग): 10, 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 18:28 वाजता, तर 11 ऑक्टोबर (रविवार) रोजी सायंकाळी 16:50 वाजता सुटेल.

कसारा ते CSMT (अप मार्ग): 10 ऑक्टोबर रोजी रात्री 20:35 वाजता, 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 18:30 वाजता, आणि 12 व 13 ऑक्टोबर रोजी रात्री 20:15 वाजता सुटेल.

मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर झालेला परिणाम

१. मुंबईकडे येणाऱ्या (Up Trains) गाड्या - 35 ते 40 मिनिटे उशिराने:

इगतपुरी (Igatpuri) स्थानकात किंवा त्याआधी खालील प्रमुख एक्सप्रेस गाड्यांचे नियमन (Regulation) केले जाईल आणि त्या 35 ते 40 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील:

10 ऑक्टोबर: गोरखपूर-LTT एक्सप्रेस (12166), हरिद्वार-LTT AC एक्सप्रेस (12172), हावडा-CSMT सुपरफास्ट (12870), गोरखपूर-LTT एक्सप्रेस (11082), अमरावती/अमृतसर-CSMT एक्सप्रेस (11058).

11 ऑक्टोबर (रविवार): धुळे-CSMT (11012), पाटलिपुत्र-LTT (12142), नांदेड-CSMT वंदे भारत (20705), प्रयागराज-LTT दुरंतो (12294), गोरखपूर-LTT (11080), छपरा-LTT (11060), आग्रा कँट-LTT लश्कर (12162), बरेली-LTT (14314), हिंगोली-CSMT जनशताब्दी (12072), गोरखपूर-LTT (15018), पटना-वास्को द गामा (12742).

12 ऑक्टोबर: कामाख्या-LTT कर्मभूमी (22512), सीतापूर-LTT सुपरफास्ट (12108).

13 ऑक्टोबर: अयोध्या कँट-LTT तुलसी एक्सप्रेस (22130).

10, 12 आणि 13 ऑक्टोबर (तिन्ही दिवशी): शिर्डी-CSMT वंदे भारत (22224 - 10 व 12 ऑक्टोबर), हावडा-CSMT गीतांजली एक्सप्रेस (12860), गोमती नगर-CSMT पुष्पक एक्सप्रेस (12533), नांदेड-CSMT तपोवन एक्सप्रेस (17618), बलिया-LTT कामायनी एक्सप्रेस (11072).

२. मुंबईवरून सुटणाऱ्या (Down Trains) गाड्या - 20 ते 25 मिनिटे उशिराने:

खालील एक्सप्रेस गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 20 ते 25 मिनिटे उशिराने चालवल्या जातील:

10, 12 आणि 13 ऑक्टोबर: LTT-राजगीर (13202), CSMT-नागपूर सेवाग्राम (12139), पनवेल-गोरखपूर (15066), LTT-सीलापूर (12107 - 10 व 12 ऑक्टोबर), CSMT-बल्हारशाह नंदीग्राम (11001), LTT-प्रयागराज वंदे भारत (20435 - 10 ऑक्टोबर), LTT-रक्सौल (12546 - 10 ऑक्टोबर), CSMT-मनमाड पंचवटी (12109), CSMT-नांदेड राज्यराणी (17612), CSMT-गोंदिया विदर्भ (12105), CSMT-फिरोजपूर पंजाब मेल (12137 - 10 व 12 ऑक्टोबर), LTT-प्रयागराज दुरंतो (12293 - 12 ऑक्टोबर), LTT-रक्सौल अंत्योदय (15268 - 12 ऑक्टोबर), LTT-प्रतापगड उद्योगनगरी (12173 - 13 ऑक्टोबर), CSMT-हावडा दुरंतो (12261 - 13 ऑक्टोबर), कोइम्बतूर-जबलपूर स्पेशल (02197 - 13 ऑक्टोबर), LTT-नांदेड (17666 - 13 ऑक्टोबर).

11 ऑक्टोबर (रविवार): CSMT-हिंगोली जनशताब्दी (12071), एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगलाद्वीप (12617), CSMT-जबलपूर गरीब रथ (12188), LTT-बलिया कामायनी (11071), दादर-गोरखपूर (11047), LTT-राजगीर (13202), CSMT-नागपूर सेवाग्राम (12139), LTT-सुल्तानपूर (12143), LTT-सहरसा स्पेशल (05586), LTT-प्रतापगड उद्योगनगरी (12173), CSMT-बल्हारशाह नंदीग्राम (11001), CSMT-हावडा दुरंतो (12261).

रेल्वे प्रशासनाने 1 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात सुधारणा केली आहे. दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी सुटणारी गाडी क्र. 22538 'LTT - गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस' (Kushinagar Express) ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथूनच पहाटे 04:30 वाजता सुटेल. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांचे सुधारित वेळापत्रक तपासूनच घरून बाहेर पडावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 13 ऑक्टोबरनंतरच्या ब्लॉकचा तपशील रेल्वेकडून लवकरच जाहीर करण्यात येईल.

आणखी वाचा

Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'