Raksha Khadse : लवकरच एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील वाद मिटवण्याच्या प्रयत्नाला यश मिळणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी केलं. संत गजानन महाराजांचे (Sant Gajanan Maharaj) दर्शन घेतल्यानंतर खडसे बोलत होत्या. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा कारभार घेतल्यानंतर मी मोठ्या ताकदीने काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे मार्गदर्शन मला लाभणार असल्याचेही खडसे म्हणाल्या. 


संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ऊर्जा मिळाली


रक्षा खडसे या कुटुंबियांसह गजानन महाराजांच्या दर्शनाला आल्या होत्या. यावेळी सोबत एकनाथ खडसे देखील होते. सून मंत्री झाल्यामुळं आमचे श्रद्धास्थान असलेल्या संत गजानन महाराजांच्या दर्शनाला आम्ही आलो आहोत. संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ऊर्जा मिळाल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. मात्र, भाजपात प्रवेश कधी होणार? हा प्रश्न विचारल्यावर एकनाथ खडसे निरुत्तरित झाले. याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 


एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशानंतर खडसे-महाजन एकत्र येणार


जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजान आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष सर्वांनाचं माहित आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपच्या काही नेत्यांवर टीकाही केली होती. तसेच गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोप झाल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेवर पाठवले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. यानंतर खडसे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही दिवसातच एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती. लोकसभा निवडणुकीत ते आपल्या सून रक्षा खडसे याच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. दरम्यान, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश होणार असल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली होती. मात्र, प्रवेश कधी होणार हे अद्याप खडसेंनी सांगितले नाही. त्यामुळं एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा खडसे आणि गिरीश महाजन एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु आहे.


महत्वाच्या बातम्या:


एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!