शिर्डी : आपण आपला वाढदिवस साजरा करतो, पण तुम्ही कधी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा विचार केलाय का? शिर्डीत झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यानिमित्तानं फळांचा आकर्षक केकही कापण्यात आला. वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे महत्व लक्षात घेत साई योग फाउंडेशन तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने वृक्षांचा पाचवा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. शिर्डीमधील राहाता येथील पंचायत समीतीनं कर्मचारी सोसायटीच्या प्रांगणात चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा केला. परिसरातील झाडांना रंगीबेरंगी फुग्यांनी तसेच पताका लावून सजवण्यात आले होते. यावेळी झाडांना केलेले डेकोरेशन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

राहाता शहरातील साई योग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बापुसाहेब पानगव्हाणे यांनी पाच वर्षांपूर्वी राहाता शहरात वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली होती. बघता बघता विविध स्तरातील नागरिक यात सहभागी होत गेले. शहरातील विविध भागांत 2 हजार पाचशेहून अधिक झाडे लावण्यात आली होती. त्यातील 2 हजार झाडं शहरवासियांना सावलीसोबत प्राणवायू देत आहेत. नुसतीच वृक्ष लागवड न करता त्याचे संगोपन अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे करणं, त्यांची निगा राखणं यासाठी अहोरात्र परिश्रम हे सर्व निसर्गप्रेमी नागरिक घेत आहेत.

दरम्यान वृक्ष लागवडीसाठी वृक्ष भेट देणारे तसेच झाडांच पालकत्व स्विकारणाऱ्या नागरिंकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी वृक्षारोपणही करण्यात आले. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. करोना संकटात ऑक्सिजनच्या कमतेरतेमुळे झाडांची किंमत सर्वांनाच कळाली. साई योग फाऊंडेशनच्या माध्यामातून सुरु असलेल्या वृक्ष चववळीत आम्हालाही योगदान देता आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उन्हाळ्यात झाडे जगवण्यासाठी टँकरने पाणी दिले. वृक्ष जीवन जगण्यासाठी उर्जा देतात. त्यामुळे झाडांचा हा अनोखा वाढदिवस साजरा करताना मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया समर्थ शेवाळे यांनी यावेळी बोलताना दिली.

शहरात आत्तापर्यत 2 झाडे लावली असून त्यातील दोन हजार झाडं बहरली आहेत. वृक्ष लागवड करून न थांबता दर गुरूवारी, रविवारी झाडांना पाणी देणं. ती नष्ट होवू नये म्हणून सुरक्षा जाळी लावणं, झाडाला आकार देणं आदी कामे मंडळाचे सदस्य आनंदाने करतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :