Tanaji Sawant : आज नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्ताराचा सोहळा (oath taking ceremony) संपन्न झाला. यामध्ये 39 नेत्यांनी मंत्रीपदाचीशपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी त्यांना पद आमि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, मंत्रीपद न मिळाल्यामुळं काही नेते नाराज असल्याची माहिती मिळत आहे. यातीलच एक नाव म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant). तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली नसल्यानं ते नाराज आहेत. मंत्रीपद मिळालं नसल्यानं तानाजी सावंत हे नागपूरच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधून बॅग पॅक करुन निघून गेले आहेत.
तानाजी सावंत यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नसल्याने ते नाराज आहेत. ते आज राजभवनावर फिरकलेच नाहीत. तानाजी सावंत नाराज झाल्यामुळं महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. गेल्या मंत्रीमंडळात तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते. त्यामुळं यावेळी मंत्रीमंडळातून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमधील राजभवन येथे संपन्न होत असून महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. मी ... ईश्वर साक्ष शपथ घेतो की, असे म्हणत महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत.
मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांची नावे
1.चंद्रशेखर बावनकुळे2.राधाकृष्ण विखे पाटील3.हसन मुश्रीफ4.चंद्रकांत पाटील5.गिरीश महाजन6.गुलाबराव पाटील7.गणेश नाईक8.दादाजी भुसे9.संजय राठोड10.धनंजय मुंडे 11.मंगलप्रभात लोढा12.उदय सामंत13.जयकुमार रावल14.पंकजा मुंडे15.अतुल सावे16.अशोक उईके17.शंभूराज देसाई18.आशिष शेलार19. दत्तात्रय भरणे20. आदिती तटकरे21. शिवेंद्रराजे भोसले22. माणिकराव कोकाटे23. जयकुमार गोरे24. नरहरी झिरवळ25 . संजय सावकारे26.संजय शिरसाट27. प्रताप सरनाईक28. भरतशेठ गोगावले29. मकरंद पाटील30. नितेश राणे31. आकाश फुंडकर32. बाबासाहेब पाटील33. प्रकाश आबीटकर
राज्यमंत्रीपदी कोणाची वर्णी
34. माधुरी मिसाळ35. आशिष जैयस्वाल36. पंकज भोयर37. मेघना बोर्डीकर38. इंद्रनील नाईक39. योगेश कदम