Cab Driver Viral Video : महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी मराठीत संवाद साधणे अनिवार्य असतानाही एका प्रवाशाने मराठीत OTP सांगितल्यावर कॅब चालकाने (Cab Driver) संताप व्यक्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत असून, कॅब चालकाच्या वागणुकीवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. चालकाने ॲप इंग्लिशमध्ये आहे, त्याच्यामुळे ओटीपी सुद्धा इंग्लिश मध्येच सांगा, असं प्रवाशाला म्हटलंय. मराठीमध्ये ओटीपी सांगू नका, मराठीमध्ये ॲप नाही, असं म्हणत प्रवाशासोबत अमराठी कॅब चालकाने वाद घातल्याचे पाहायला मिळतआहे.
Cab Driver Viral Video: व्हायरलव्हिडीओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
एकीकडे, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, पैसे कमवायचे असतील, तर मराठी संस्कृतीचा आणि अभिजात भाषेचा मान-सन्मान ठेवावाच लागेल, असा थेट आणि कडक इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. तर 1989 च्या महाराष्ट्र मोटार वाहन नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी सर्व परप्रांतीय व स्थानिक वाहनचालकांना केले आहे. तसेच ज्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावर 20 ऑगस्टपासून कारवाई सुरू होणार असल्याची माहितीही सरनाईकांनी दिली. सोबतच परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी शिकवण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. ती यापुढेही सुरू ठेवणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय. असेअसतानाकाहीकाहीरिक्षाआणिकॅबचालक शासन निर्णयाचाविरोधातआवाजकाढतमग्रुरीनेवागतानादिसतआहे. अशातचयाव्हायरलव्हिडीओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात असून शासनाच्यानिर्णयाचेहीसमर्थनकेलंजातआहे.
नेमकंप्रकरणकाय? (Cab Driver Controversy Viral Video)
सध्यासोशलमीडियावरएकाकॅबचालकाचाआणिमराठी प्रवाशामधीलवादाचाव्हिडीओव्हायरलहोतआहे. यात प्रवाशाने मराठीत OTP सांगितल्यावर कॅब चालकाकडून संताप व्यक्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. चालकाने ॲप इंग्लिशमध्ये आहे, त्याच्यामुळे ओटीपी सुद्धा इंग्लिश मध्येच सांगा, असं प्रवाशाला म्हटलंय. मराठीमध्ये ओटीपी सांगू नका, मराठीमध्ये ॲप नाही, असं म्हणत प्रवाशासोबत अमराठी कॅब चालकाने वाद घातल्याचेयाव्हिडीओमध्ये पाहायला मिळतआहे. त्यावर महाराष्ट्रात तुम्ही टॅक्सी चालवता, महाराष्ट्राने तुम्हाला लायसन दिलं, तर मी मराठीतच बोलणार, अशा प्रवाशांनी सांगितलंय. त्यामुळे काही काळ या दोघांमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमकं कधीचा आणि कुठला आहे याची अद्याप माहिती मिळू शकली नाही, मात्रया घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, कॅब चालकाच्या वागणुकीवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
