बीड: दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात, बस चालकाचा मृत्यू झाला, तर 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी आहेत. अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या वरवटी गावाजवळ आज सकाळी 8 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गंगाखेड - पुणे आणि लातूर - परभणी या दोन बस वेगाने समोरासमोर आल्या. दोन्ही बसवर चालकांचं नियंत्रण राहिलं नाही, त्यामुळे त्या एकमेकींना धडकल्या. या अपघातात लातूर - परभणी गाडीचे चालक मारूती गोपीनाथराव कातकडे (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान,  सर्व जखमी प्रवाशांवर अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.