धक्कादायक! शेगावमध्ये युवकाची भोकसून हत्या, परिसरामध्ये भीतीचं वातावरण, आरोपीचा शोध सुरु
बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेगाव शहरातील चिंच परिसरात थोड्याच वेळापूर्वी युवकाची भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Bulldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेगाव शहरातील चिंच परिसरात थोड्याच वेळापूर्वी युवकाची भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नितीन गायकवाड असं या हत्या करण्यात आलेल्या युवकाच नावं आहे. तो मूळचा वाशीम येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्याची हत्या कुणी व कशासाठी केली याचा शोध आता शेगाव शहर पोलीस घेत आहेत.
भविकांची शेगावमध्ये गर्दी, भीतीचं वातावरण
शेगाव शहरात धक्कादायक घटना घडली आहे. शहरात एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्यामुळे लाखो भविकांची शेगावमध्ये गर्दी असल्याने भविकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. दरम्यान, या युवकाची हत्या नेमकी का झाली? कोणी केली? याबाबतचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:



















