बुलढाण्यात आदिवासी आश्रम शाळेतील 13 विध्यार्थीनींना विषबाधा, 5 विद्यार्थीनी गंभीर, उपचार सुरु
बुलढाणा (Buldhana) तालुक्यातील येळगावं येथील पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील (Painganga Adivasi Ashram Shala) 13 विध्यार्थीनींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

Buldhana : बुलढाणा (Buldhana) तालुक्यातील येळगावं येथील पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील (Painganga Adivasi Ashram Shala) 13 विध्यार्थीनींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये पाच विध्यार्थीनी गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. रात्रीच्या जेवणातील कढी भात खाल्यानंतर विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. विद्यार्थिनींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पैनगंगा आदिवासी आश्रम शाळा ही भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांची आहे.
बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना काल रात्री कडी आणि भात खाल्ल्याने विषबाधा झाली. अचानक मुलींना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरु झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील पाच विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पैनगंगा आदिवासी आश्रम शाळा ही बुलढाण्याचे माजी आमदार व सध्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची आहे.
रात्रीच्या जेवणातील कढी भात खाल्यानंतर विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या जेवणातील कढी भात खाल्यानंतर विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला जाणवू लागला होता. त्यानंतर तात्काळ विद्यार्थिनींना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, यामधील पाच विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Gondia Food Poisoning : लग्नाच्या जेवणातून 55 ते 60 जणांना विषबाधा; 4 जणांची प्रकृती चिंताजनक, गोंदियाच्या गोरेगावातील घटना



















