Sanjay Gaikwad :  मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल. आमच्या जागा जास्त आल्या तर आमचा महापौर होईल असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला, .याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेतील असेही गायकवाड म्हणाले. जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करु असेही गायकवाड म्हणाले.

Continues below advertisement

मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे

मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला .याचा फायदा महा विकास आघाडीला होणार आहे. .याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेतील. जास्त जागा भाजपा  लढणार असल्याने ते ठामपणे सांगू शकतात की महापौर आमचा होईल असे गायकवाड म्हणाले. जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करु असेही गायकवाड म्हणाले. 

सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100 टक्के खोटं आहे

भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात असं वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी केलं होतं.  त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकतं. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो. आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे असल्याचे गायकवाड म्हणाले. आम्ही जी क्रांती केली त्यामुळं भाजप आणि महायुती सरकारमध्ये असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.  सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100 टक्के खोटं आहे. शिवसेना हा पक्ष ध्येय धोरणावर चालतो. लोढा यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही असे मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.

Continues below advertisement

वृक्षांशी अनेकांची आस्था जोडलेली आहे

कुंभमेळ्यासाठी एवढी मोठी झाडं तोडणे, त्या वृक्षांशी अनेकांची आस्था जोडलेली आहे. भावना जोडलेली आहे असे गायकवाड म्हणाले. आस्थेचा आणि भावनेचा विचार केला गेला पाहिजे. विकास करत असताना जंगलाचा ऱ्हास करतो , पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. ग्लोबल वॉर्मिग प्रॉब्लेम उभा राहिला आहे. त्यामुळे शिवसेना जनतेच्या सोबत उभी आहे असे गायकवाड म्हणाले.