डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू, बुलढाण्यातील चिखलीत घडली घटना
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली शहरातील शासकीय क्रीडा संकुलात असलेल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Buldhana : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली शहरातील शासकीय क्रीडा संकुलात असलेल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सायंकाळी चिखली शहरातीलच रामसिंग चुनीवाले आयुर्वेदिक महाविद्यालयात द्वितीय वर्षाला बीएएमएस शिक्षण घेणारे हे दोन विद्यार्थी होते. विवेक वायडे ( गेवराई जी बीड व विवेक वायले ( तेल्हारा जि.अकोला) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
आज सायंकाळी शासकीय क्रीडा संकुलात सुरु असलेल्या रेनबो स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेले होते. मात्र, अचानक ते बुडून मरण पावले. त्यांना तात्काळ उपस्थितांनी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी संबंधित घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास चिखली शहर पोलीस करत आहेत. सध्या दोघांचेही मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Nandurbar News : म्हशीला वाचवताना दोघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत, पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटूंबावर दु:खाचा डोंगर
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
महत्त्वाच्या बातम्या





















