Buldhana Lonar Lake : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या (Buldhana Lonar Lake)  पाण्याच्या पातळीत गेल्या सप्टेंबर महिन्यापासून झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, या वाढलेल्या पाण्यामुळे लोणार सरोवरात (Lonar Sarovar) अकराव्या व बाराव्या शतकातील अनेक प्राचीन मंदिरे ही पाण्यात बुडाली आहेत. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे लोणार सरोवराची जैवविविधता ही धोक्यात आली आहे. मात्र यावर केंद्र आणि राज्य सरकारचा कुठलाही विभाग दखल घेत नसल्याने आता लोणारवासियांनी चक्क 'वर्ल्ड हेरिटेज सेंटर' आणि 'युनेस्को' ला पत्र लिहलंआहे. सोबतच याबाबत हस्तक्षेप करून तात्काळ लोणार सरोवर वाचवावं, अशी विनंती केली आहे.

Buldhana Lonar Lake : ..... अन्यथा 15 ते 20 हजार लोणारवासीय समृद्धी महामार्ग रोखून धरणार

विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वीच युनेस्कोने लोणार सरोवराला 'रामसर दर्जा' दिलेला आहे. लोणार सरोवराचे अभ्यासक डॉ.गोपाल बच्छिरे यांनी केंद्र सरकारला ही पत्र लिहून लोणार सरोवराबाबत उपाययोजना कराव्या, अन्यथा, पंधरा दिवसात पंधरा ते वीस हजार लोणारवासीय हे समृद्धी महामार्ग रोखून धरतील असा इशाराही दिला आहे.

Lonar Lake : उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती

लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे विवरातच आहेत. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

लोणार हे जगातील सर्वात मोठं अंडाकृती सरोवर आहे. उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली आहे. लोणार सरोवर हे जगातील दुसरं सर्वात मोठं सरोवर आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं लोणार सरोवर परिसरात असलेल्या पाच मंदिरांना पाण्यानं वेढा दिला होता. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली होती.

Lonar Sarovar : लोणार सरोवरातील जैवविविधता धोक्यात

लोणार सरोवर परिसरात अनेक विकास कामे झाली तर रस्त्याची ही बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली. तसेच लोणार तालुक्यात जलसंधारणाची कामे झाली आणि त्यामुळे पाणी हे साठवून लोणार सरोवरातील झरे हे प्रभावीत झाले त्यामुळे लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर लोणार सरोवराचे पाणी हे अल्कधर्मी असल्याने आता पाण्याच्या गुणधर्मातही बदल होत असल्याने लोणार सरोवरातील जैवविविधता ही धोक्यात आली असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा

Accident In Jalgaon: इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक डॉ. उल्हास पाटील गंभीर जखमी, जळगावमधील घटना