Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात आगारातील महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाने विनयभंग केल्याची घटना घडलीय. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सहा महिने उलटूनही आद्याप आरोपींवर (Crime News) कारवाई केलेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. परिणामी पिडीत महिला वाहाकाने शेगाव बस स्थानकासमोर गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू करत आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ही या निमित्याने चर्चेत आला आहे.
माझी मागणी पूर्ण केली तर तुला मनाप्रमाणे ड्युटी मिळेल...
पुढे आलेल्या माहितीनुसार, 'माझी मागणी पूर्ण केली तर तुला मनाप्रमाणे ड्युटी मिळेल...!" असं म्हणत या आगार व्यवस्थापकाने या महिला वाहकाचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी शेगाव पोलीस स्थानकात 21 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हाही दाखल झाला. मात्र सहा महिने उलटून ही या प्रकरणातील चार आरोपींवर कुठलीही कारवाई पोलिसांनी अथवा राज्य परिवहन महामंडळाने न केल्याने या महिलेने नागपूर उच्च न्यायालयात दाद मागितली. नागपूर उच्च न्यायालयाने आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देशही बुलढाणा पोलीस (Buldhana Police) अधीक्षकांना दिले. मात्र तरीही आरोपींवर कारवाई न झाल्याने पीडित महिला वाहकाने शेगाव बस स्थानकासमोर उपोषण सुरू केल आहे.
सहा महिने उलटून कारवाई नाही, पीडितेवर उपोषण करण्याची वेळ
गेल्या आठ दिवसापासून हे उपोषण सुरू आहे. मात्र आरोपींवर ही कारवाई तर सोडाच पण या महिलेच्या उपोषणाची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांच्या बाजूने साक्ष देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या प्रमोद पोहरे या कर्मचाऱ्यालाही महामंडळाने निलंबित केलंय. त्यामुळे अद्यापही पीडित आरोपींवर कारवाई होण्याची वाट बघत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या