बुलढाण्यात केळी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी
लढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुक्ताईनगर - अकोट मार्गावर केळीने भरलेल्या भरधाव ट्रकला अपघात झाला आहे. टूनकी गावाजवळ महार्गावरील खड्डा चुकवताना भरधाव ट्रकला हा अपघात झाला आहे. अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त ट्रक मधील केळीचे घड पसरल्याने काही काळ वाहतूक ठप्प
महामार्गावर अपघातग्रस्त ट्रक मधील केळीचे घड पसरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, टूनकी गावाजवळ महार्गावरील खड्डा चुकवताना भरधाव ट्रकला हा अपघात झाला आहे. मात्रया यामुळं दोन जणांचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावर तीन वाहनांचा अपघात विचित्र अपघात
मुंबई गोवा महामार्गावर तीन वाहनांचा अपघात विचित्र अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पेण जवळ असणाऱ्या जिते गावानजीक हा अपघात घडलाय, मुंबईच्या दिशेने जात असताना 3 वाहने एकमेकांवर आदळून मोठ नुकसान झालंय.अचानक ब्रेक मारल्याने ही वाहने एकमेकांवर आदळल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या अपघाता मध्ये जीवित हानी टळली आहे.
वर्धा जिल्ह्यात देखील भीषण अपघात, झायलो कारने समोर चालणार्या ऑटो रिक्षाला दिली मागून धडक
वर्धा जिल्ह्यात देखील भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. निष्काळजीपणे चालवलेल्या झायलो कारने समोर चालणार्या ऑटो रिक्षाला मागून धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात ऑटो रिक्षा पुढे उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून एका महिलेला डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. केसरीमल शाळेपुढील रस्ता वर्दळीचा आहे. पुढेच शाळा असल्याने विद्यार्थी, पालक आणि स्कूल बसचे येणे जाणे सुरू असते. या अपघातात ऑटो रिक्षा आणि उभी असलेली कार दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. तर रिक्षातील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, नेमका अपघात कसा घडला याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, चालकाच्या निष्काळजीपणा मुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Mumbai Accident: मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बीएमडब्ल्यू अन् पोर्शे कारची शर्यत, कार पलटी होऊन भीषण अपघात, चालक गंभीर जखमी



















