स्कॉर्पिओ-ट्रकचा भीषण अपघात, आठ महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 15 Apr 2019 11:24 AM (IST)
अपघातात जुमडे कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, दोघं जण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी आहे
बुलडाणा : बुलडाण्यातील मेहकर-डोनगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात जुमडे कुटुंबावर काळाने घाला घातला. अपघातात जुमडे कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मृतांमध्ये अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. जुमडे कुटुंबीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील महू येथे गेले होते. त्यावेळी परत येताना त्यांच्या स्कॉर्पिओचा आणि ट्रकसोबत भीषण अपघात झाला. रात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास अंजनी फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. अपघातात जुमडे कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, दोघं जण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी आहे. मृतांमध्ये आठ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. मृत कुटुंब मेहकर तालुक्यातील अंजनी गावचे रहिवासी होते.